कोकण
देवरूख-देवरुखात मच्छीमार्केटसाठी मंत्री नितेश राणेंना निवेदन
देवरूखात मच्छीमार्केटसाठी
मंत्री नितेश राणेंना निवेदन
देवरूख, ता. २३ ः देवरूख शहरात सुसज्ज मच्छीमार्केट उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मत्स्योद्योग आणि बंदरविकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे करण्यात आली.
देवरूख शहरातील मच्छीविक्रेते आणि ग्राहकांची गैरसोय दूर करण्यासाठी एक सुसज्ज मार्केट असावे, ही अनेक दिवसांची मागणी होती. या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने मुंबईत मंत्रालयात जाऊन मंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. मंत्री नितेश राणे यांनी देवरूखच्या या मागणीची दखल घेत मत्स्योद्योग विभागामार्फत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या वेळी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, अभिजित शेट्ये आणि नीलेश भुरवणे उपस्थित होते.

