टाळसुरेतील डोंगररांगांमध्ये सापडली लेणीसदृश्य वास्तू

टाळसुरेतील डोंगररांगांमध्ये सापडली लेणीसदृश्य वास्तू
Published on

- rat२५p७.jpg-
P26O33195
टाळसुरे येथे सापडलेला शिलालेख
- rat२५p८.jpg-
26O33196
टाळसुरे याठिकाणी सापडलेली देवमूर्ती.

टाळसुरेतील डोंगररांगांमध्ये सापडली लेणीसदृश वास्तू
ग्रामस्थांची शोधमोहीमेस यश ; दगडात आढळली कोरलेली देवमूर्ती
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २५ : तालुक्यातील टाळसुरे गावाजवळील डोंगररांगांमध्ये लेणीसदृश प्राचीन वास्तू तसेच दगडात कोरलेली देवमूर्ती आढळली आहे. त्यामुळे या परिसरात उत्सुकतेचे वातावरण आहे. या भागाच्या ऐतिहासिक महत्त्वाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, पुढील संशोधनाची मागणी सुरू झाली आहे. दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर यांच्या पुढाकारातून ग्रामस्थांनी ही शोधमोहीम हाती घेतली आहे.
दापोली-खेड मार्गापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर, दाट जंगलाने वेढलेल्या डोंगररांगांमध्ये ही वास्तू आढळून आली. सुरुवातीला झाडाझुडूपांनी पूर्णपणे झाकलेल्या या ठिकाणी ग्रामस्थांनी साफसफाई केल्यानंतर अरुंद प्रवेशमार्ग आणि गाळाने भरलेली आतील रचना दिसून आली. या ठिकाणी दगडात कोरलेली एक सुबक देवमूर्ती आढळली असून, ती मारूती किंवा विष्णूची असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे; मात्र संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्याने वास्तूचे मूळ स्वरूप आणि त्याचा कालखंड निश्चित करण्यासाठी शास्त्रशुद्ध उत्खनन आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.
विशेष म्हणजे, ही वास्तू गावातून वाहणाऱ्या नदीच्या काठावर आढळली असून, हीच नदी पुढे पन्हाळेकाजी लेणी परिसराशी जोडली जाते. त्यामुळे या नव्याने सापडलेल्या रचनेचा पन्हाळेकाजी लेण्यांशी ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत पुरातत्त्व विभागाने सखोल अभ्यास करण्याची गरज व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, परिसरात आणखी काही कातळशिल्पे असल्याची शक्यता असून, येत्या काळात परिसराची साफसफाई करून संवर्धन करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
---
कोट
ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे गावात ही शोधमोहीम राबवण्यात आली आहे. या परिसरात अद्याप मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्याने शास्त्रशुद्ध उत्खननाची आवश्यकता आहे. या परिसरातील नदीचा संबंध पन्हाळेकाजी लेणी परिसराशी असल्याने ऐतिहासिकदृष्टीने अभ्यास झाला पाहिजे तसेच या ठिकाणी कातळशिल्पदेखील आढळून आली आहेत. या ठिकाणाचा विकास झाल्यास टाळसुरे गाव पर्यटनाच्या नकाशावर येईल व स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
- जयवंत जालगावकर, टाळसुरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com