

rat२७p५.jpg-
26O33699
रत्नागिरी : डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्रात बोलताना तकनिकी शब्दावली आयोगाचे (शिक्षा मंत्रालय) सहाय्यक निदेशक डॉ. शहजाद अन्सारी. डावीकडून डॉ. संजय गायकवाड, डॉ. दिनकर मराठे व डॉ. निधी पटवर्धन.
संस्कृत शब्दसंग्रहामुळे भारतीय भाषांमध्ये एकसंधता
डॉ. शहजाद अन्सारी ः शब्दकोश कार्यशाळेत शोधले प्रतिशब्द
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : संस्कृत ही भारतीय भाषांची मूळ जननी असल्यामुळे प्रथम संस्कृतमधील संकल्पना स्पष्ट केल्यास त्या इतर भाषांमध्ये अधिक अचूक व सुलभपणे मांडता येतात, नव्या सिद्धांतानुसार संस्कृतला केंद्रस्थानी ठेवून कार्य करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे विविध भारतीय भाषांमध्ये एकसंध व प्रमाणित परिभाषा विकसित होण्यास मदत होत आहे, असे गौरवोद्गार वैज्ञानिक तथा तकनिकी शब्दावली आयोगाचे (शिक्षा मंत्रालय) सहाय्यक निदेशक डॉ. शहजाद अन्सारी यांनी काढले.
वैज्ञानिक तथा तकनिकी शब्दावली आयोग (शिक्षा मंत्रालय) भारत सरकार आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारतातील ज्ञानपरंपरा आणि प्रथा यांचा विद्यार्थ्यांसाठी शब्दकोश (संस्कृत-मराठी) या पाच दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. रत्नागिरी उपकेंद्रात पाच दिवस कार्यशाळा झाली.
कार्यक्रमात पुणे येथील डॉ. संजय गायकवाड यांनी कार्यशाळेची कालपरत्वे वाढणारी उपयोगिता व प्रादेशिक भाषांच्या संवर्धनासाठी आयोगाचे काम कसे चालते, यावर प्रकाश टाकला. रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी संस्कृत भाषेची उपयोगिता अधोरेखित करतानाच संस्कृत भाषेमध्ये असलेले शब्द वैविध्य स्पष्ट केले.
------
२४०० शब्दांवर काम
कार्यशाळेमध्ये सुमारे २४०० परिभाषिक शब्दांवर सखोल चर्चा व निर्मितीकार्य सुरू आहे. हे सर्व शब्द भारतीय ज्ञानप्रणालीशी संबंधित आहेत. वेद, उपनिषद, दर्शनशास्त्र, आयुर्वेद, योग, गणित, कला इत्यादी ४०हून अधिक विषयांचा या शब्दावलीमध्ये समावेश आहे. भारतीय ज्ञानपरंपरा क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी, संशोधक व अभ्यासकांसाठी हा परिभाषा कोश मार्गदर्शक ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.