शक्य तितक्या ग्रामपंचायती बिनविरोध

शक्य तितक्या ग्रामपंचायती बिनविरोध
Published on

34757

शक्य तितक्या ग्रामपंचायती बिनविरोध

मालवणात भाजपची भूमिका; राणेंच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १ : ‘‘निवडणुकांमुळे गावात गट-तट किंवा वाद निर्माण होऊ नयेत, अशी आमची भावना आहे. त्यामुळे शक्य तिथे राजकीय पक्ष विरहित ‘गाव पॅनेल’च्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध किंवा समन्वयाने व्हाव्यात, अशा सूचना स्थानिक कार्यकर्त्यांना दिल्या आहेत, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपचा स्थापना दिवस आणि कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस यांचे औचित्य साधून तालुक्यात ६ ते १० एप्रिल या काळात विविध सेवाभावी व रचनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या नियोजनासाठी भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. याची माहितीही भाजपचे तालुकाध्यक्ष चिंदरकर यांनी यावेळी दिली. येथील भाजप कार्यालयात ही पत्रकार परिषद पार पडली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, दाजी सावजी, मंदार केणी, महेश मांजरेकर, पंकज सादये, जीवन भोगावकर, भाई कासवकर, पालिकेच्या गटनेत्या अन्वेशा आचरेकर, महिमा मयेकर, रश्मी लुडबे, अमिता निवेकर, महानंदा खानोलकर, संतोषी कांदळकर, उपसभापती श्याम झाड, जिल्हा परिषद सदस्या क्षमा हडकर, पंचायत समिती सदस्या योजना कांबळी, विजय निकम, दीपक सुर्वे उपस्थित होते.
चिंदरकर पुढे म्हणाले की, ‘‘भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पक्षाच्या धोरणाप्रमाणे तालुक्यातील प्रत्येक बूथवर भाजपचा झेंडा लावला जाणार आहे. यासाठी विभागवार बैठकांचे नियोजन पूर्ण झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. ६ ते १० एप्रिल या पाच दिवसांच्या कालावधीत स्वच्छता मोहीम, वृक्षलागवड आणि अन्नदान यांसारखे सामाजिक उपक्रम राबवून हा उत्सव साजरा केला जाईल.’’
खासदार राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणमध्ये गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी यांसह इतर जिल्ह्यांतील संघ सहभागी होतील. स्पर्धेच्या नियोजनाची जबाबदारी बाबा परब आणि ललित चव्हाण यांच्याकडे सोपवली आहे.
तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपची भूमिका स्पष्ट करताना चिंदरकर म्हणाले की, ‘‘निवडणुकांमुळे गावात गट-तट किंवा वाद निर्माण होऊ नयेत, अशी आमची भावना आहे. त्यामुळे शक्य तिथे राजकीय पक्ष विरहित ‘गाव पॅनेल’च्या माध्यमातून निवडणुका बिनविरोध किंवा समन्वयाने व्हाव्यात, अशा सूचना स्थानिक कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. शांततेत आणि गावच्या विकासासाठी या निवडणुका पार पडाव्यात, असा भाजपचा प्रयत्न राहील.’’
....................
मतदार नोंदणी मोहीम तीव्र करणार
मतदार याद्यांच्या पुनर्रचना कार्यक्रमांतर्गत सध्या नवीन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या मोहिमेत भाजपचे बीएलओ सक्रिय सहभाग घेणार आहेत. याद्यांमधील त्रुटी दूर करून जास्तीत जास्त तरुण मतदारांची नोंदणी मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याच काळात पक्षाची नवीन सदस्य नोंदणी मोहीमही अधिक तीव्र केली जाणार असल्याचे चिंदरकर यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com