आत्महत्यांचे वृत्तांकन संवेदनशील हवे

आत्महत्यांचे वृत्तांकन संवेदनशील हवे
Published on

आत्महत्यांचे वृत्तांकन संवेदनशील हवे

दयानंद कुबल ः प्रसारमाध्यमांना आवाहन


सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ११ ः सावंतवाडी तालुक्यात अलीकडच्या काळात तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून, या गंभीर परिस्थितीवर सामाजिक कार्यकर्ते दयानंद कुबल यांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा घटना घडल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्या बातम्यांना अनावश्यक प्रसिद्धी किंवा सनसनाटी स्वरूप देण्याऐवजी अत्यंत संवेदनशीलतेने हाताळावे, असे आवाहन त्यांनी केले.
याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आत्महत्यांच्या बातम्यांचे वारंवार आणि ठळकपणे होणारे वृत्तांकन मानसिकदृष्ट्या खचलेल्या तरुणांच्या मनावर नकारात्मक प्रभाव टाकू शकते, ज्यामुळे त्यांच्यात नैराश्य अधिक गडद होण्याची भीती आहे. माध्यमांनी केवळ बातमी म्हणून याकडे न पाहता समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन समुपदेशनाची भूमिका मांडणे अधिक गरजेचे आहे. मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मताचा दाखला देत कुबल यांनी स्पष्ट केले की, घटनांचे तपशीलवार आणि अतिरंजित वर्णन केल्यास अस्थिर मानसिकतेचे तरुण टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त होऊ शकतात. अशावेळी माध्यमांनी संकटावर मात करून यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या कथा समाजासमोर आणाव्यात. तसेच नैराश्यात असलेल्या व्यक्तींसाठी उपलब्ध असलेली मदत केंद्रे आणि समुपदेशन सुविधांची माहिती पोहोचवल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. आजच्या काळात तरुणांशी संवाद साधणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यांना योग्यवेळी मार्गदर्शन मिळवून देणे, ही काळाची गरज आहे. प्रसारमाध्यमांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून संतुलित वृत्तांकन केल्यास नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या तरुणांना नवी दिशा मिळण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास श्री. कुबल यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com