साडवली ः देवरूख पोस्ट ऑफिस हे तळमजल्यावरच असावे

साडवली ः देवरूख पोस्ट ऑफिस हे तळमजल्यावरच असावे
Published on

‘देवरूख टपाल कार्यालय
तळमजल्यावरच हवे’
साडवली, ता. १३ : केंद्र सरकारच्या अख्यारित असलेले टपाल कार्यालय हे दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर न ठेवता ते तळमजल्यावरच असावे, अशी मागणी देवरूखमधील ज्येष्ठ नागरिकांनी आणि दिव्यांग बांधवांनी केली आहे.
बॅंक, पतसंस्थांच्या तुलनेत पोस्टखात्यात अधिक आर्थिक व्यवहार होत असतात. पोस्टखात्यावर नागरिकांचा प्रचंड विश्वास आहे. देवरूख पोस्ट ऑफिस बरेच वर्ष प्रतिज्ञा बिल्डिंग येथे दुसऱ्या मजल्यावर होते. तिथे जिने चढून जायला लागत होते. यामुळे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत होता. तेथून हे कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील एका बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर नेण्यात आले. यामुळे खातेदारांना पुन्हा जिनेच चढावे लागणार आहेत. याबाबत ज्येष्ठ नागरिकांनी हे कार्यालय तळमजल्यावर व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग बांधवांना जिने चढताना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com