टिकलीवर साकारली आशा भोसलेंची प्रतिमा

टिकलीवर साकारली 
आशा भोसलेंची प्रतिमा
Published on

37261

टिकलीवर साकारली
आशा भोसलेंची प्रतिमा
तळेरे, ता. १४ : भारतीय संगीत क्षेत्रातील अष्टपैलू आवाज आणि तमाम रसिकांच्या लाडक्या गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी येथील चित्रकार व दशावतारी नाट्य कलावंत श्रुती सुतार यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. आशाताईंच्या सौंदर्याचे आणि स्त्रीशक्तीचे वैशिष्ट्य असलेल्या ‘लाल टिकली’वर श्रुती यांनी आशाताईंची सूक्ष्म आणि बोलकी प्रतिमा साकारली आहे.
आशाताईंचे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येताच त्यांचा मधुर आवाज, चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य आणि कपाळावरील ठसठशीत लाल टिकली प्रकर्षाने जाणवते. हीच लाल टिकली स्त्रीशक्तीचे प्रतीक मानून श्रुती यांनी अवघ्या १ सेमी रुंदी आणि १ सेमी उंचीच्या टिकलीवर ही कलाकृती चितारली आहे. अत्यंत संयम आणि कौशल्याचा वापर करून साकारलेली ही प्रतिमा सध्या सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. श्रुती सुतार या चित्रकलेसोबतच दशावतारी नाट्य कलेतही सक्रिय आहेत. त्यांच्या यापूर्वीच्या विविध प्रयोगात्मक कलाकृतींचेही कौतुक झाले असून, आता गानसम्राज्ञीला दिलेल्या या ‘सूक्ष्म’ मानवंदनेचे सर्वस्तरांत कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com