

37309
उपरकरांचा लढाऊ बाणा आदर्शवत
संदेश पारकर : कणकवलीत सत्कार सोहळा उत्साहात
कणकवली, ता. १४ : शिवसेना नेते आणि माजी आमदार परशूराम उपरकर यांनी अन्यायाविरोधात नेहमीच रस्त्यावर उतरून संघर्ष केला. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून शेतकरी, मच्छीमार आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी त्यांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. श्री.उपरकर यांच्यातील हा लढाऊ बाणा आणि समाजसेवेचा वारसा नव्या पिढीने आत्मसात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज केले.
येथील भगवती मंगल कार्यालयात परशूराम उपरकर यांचा सत्कार नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केला. यावेळी ते बोलत होते. सत्कार कार्यक्रमानंतर आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.
नाईक म्हणाले, ‘‘जीजी उपरकर हे कोणत्याही अमिषाला बळी पडले नाहीत. शिवसेना पक्षाशी ते निष्ठावंत राहिले. स्वतःला काहीतरी मिळाले पाहिजे असा विचार त्यांनी कधीही केला नाही तर पक्ष वाढीसाठी सातत्याने धडपड सुरू ठेवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा शिवसेना वाढविण्याचे काम करूया.’’
उपरकर म्हणाले, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना लोकांना जे काही देणे शक्य आहे ते देत राहण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवसैनिकांना साथ देऊन शिवसेना संघटना पूर्ववत करण्याचा वाढदिवसानिमीत्त संकल्प करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धवजी ठाकरेंना अभिप्रेत असलेली संघटना पुन्हा एकदा उभी करूया असे त्यांनी यावेळी आवाजन केले. यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर, लुकेश कांबळे, संतोष सावंत, चंद्रशेखर उपरकर, विलास गुडेकर, किरण हुन्नरे, समीर परब, जगन्नाथ आजगावकर, राजू कोरगावकर, संजय बेलवलकर, प्रवीण कोरगावकर, पप्पू कोरगावकर, संदीप म्हाडगूत, शैलेश नेरकर, प्रमोद सावंत, उमेश हजारे, पुरुषोत्तम तारी, निलेश चव्हाण, डेरवण रुग्णालयाचे डॉ. अमित वालावलकर, डॉ. क्रिशांत दिवाटे, डॉ. पूजा गीते,डॉ. आकाश राऊळ,अमित वैद्य आदी उपस्थित होेते. दरम्यान आरोग्य शिबिरात विविध आजारांवर बी. के. एल. वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण च्या वैद्यकीय टीमने उपचार केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.