जलजीवनच्या विहिरीत खासगी पंपांचा विळखा

जलजीवनच्या विहिरीत खासगी पंपांचा विळखा
Published on

-ratchl१६१.jpg ः
26O37730
चिपळूण ः दहविली बुद्रूक येथे जलजीवन मिशन योजनेतून बांधलेली विहीर.
-----
जलजीवनच्या विहिरीतून खासगी पंपांद्वारे उपसा
दहिवली कातळवाडीत टंचाई; शेतीसाठी पाणी, ग्रामस्थांचे घसे कोरडे
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ ः तालुक्यातील दहिवली बुद्रूक येथील कातळवाडीसाठी केंद्र सरकारच्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत पिण्याच्या पाण्याची योजना राबवण्यात आली; मात्र, या योजनेच्या विहिरीतून चक्क खासगी शेतीसाठी पाण्याचा उपसा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने कारवाई न केल्याने संतापलेल्या कातळवाडी ग्रामस्थांनी येत्या १ मे (महाराष्ट्र दिन) पासून चिपळूण पंचायत समितीसमोर आमरण उपोषण छेडण्याचा निर्णय घेतला आहे.
दहिवली बुद्रूक येथील कातळवाडीच्या पाणीप्रश्नासाठी दोन वर्षांपूर्वी जलजीवन मिशनमधून विहीर खोदण्यात आली होती. अलीकडेच या योजनेची वीजजोडणी पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरू झाला; मात्र, ज्या जागेत ही विहीर आहे त्या विहिरीत १ एचपीचे दोन विद्युतपंप विनापरवाना लावून ७१ गुंठे शेतीसाठी पाण्याचा उपसा सुरू केला आहे. यामुळे वाडीला होणारा पाणीपुरवठा खंडित होऊन भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेतीसाठी वापरले जाणारे पंप विहिरीत खोलवर टाकण्यात आले आहेत तर सार्वजनिक नळपाणी योजनेचा पंप वरच्या थरावर (कातळावर) आहे. विहिरीतील पाणी कमी झाले की, सार्वजनिक योजनेचा उपसा बंद होतो; मात्र खासगी पंप सुरूच राहतात. या अन्यायाविरोधात भालचंद्र जयराम घाग व इतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार धाव घेतली. प्रशासकांनी संबंधितांना पंप काढण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. दरम्यान, या प्रकरणाकडे पंचायत समिती प्रशासन गांभीर्याने पाहणार की, ग्रामस्थांना उपोषणाचे पाऊल उचलावे लागणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
----
३० एप्रिलपर्यंत मुदत
१७ मार्च २०२३ रोजी संमतिपत्राद्वारे या विहिरीसाठी जागा देण्यात आली होती; मात्र, आता त्याच विहिरीतून व्यावसायिक भाजीपाल्यासाठी पाणी वापरून वाडीला तहानलेले ठेवले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत हे अनधिकृत पंप न काढल्यास १ मे रोजी संपूर्ण कातळवाडी चिपळूण पंचायत समितीसमोर उपोषणाला बसणार आहे, असे भालचंद्र घाग यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com