

-rat१९p९.jpg-
26O38308
रत्नागिरी : येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये. डावीकडून आशिष पांडे, नीरज यादव आणि डॉ. श्रीधर ठाकूर.
----
आजारापूर्वीच डोळ्यांचे आरोग्य जपा
डॉ. आठल्ये ः ‘इन्फिगो आय केअर’मध्ये कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : डोळे हा सर्वांत महत्त्वाचा अवयव आहे. झोप हा डोळ्यांचा व्यायाम आहे. परंतु आजकाल कॉम्प्युटर, टीव्ही, मोबाईलमुळे झोप उडाली आहे. डोळ्यांसाठी साधे सोपे व्यायाम आहेत, ते केले पाहिजेत. बऱ्याचदा तहान लागल्यावर विहीर खणली जाते, परंतु आधीपासूनच काळजी घेऊन डोळ्यांचे आरोग्य जपावे, असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले.
इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये रविवारी आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. इन्फिगो आय केअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी स्वागत करून या कार्यशाळेची गरज सांगितली. याप्रसंगी व्ही स्क्वेअर कंपनीचे आशिष पांडे व नीरज यादव उपस्थित होते.
आधुनिक जीवनशैलीत चष्म्याच्या तुलनेत कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर वाढत आहे. या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, फायदे, लेन्सची योग्य निवड, व ग्राहकांना सेवा याबद्दल तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कॉन्टॅक्ट लेन्स हे थेट डोळ्यांवर बसवले जात असल्यामुळे दृष्टी अधिक नैसर्गिक आणि स्पष्ट दिसते. चष्म्याप्रमाणे काचेवर धूळ, पावसाचे थेंब किंवा वाफ साचण्याचा त्रास होत नाही. खेळाडू, प्रवास करणारे किंवा सतत हालचालीत असणारे लोक लेन्सला अधिक पसंती देतात. कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना स्वच्छतेची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक असते. योग्य प्रकारे देखभाल न केल्यास डोळ्यांचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लेन्सचा वापर करावा, अशी माहिती देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.