

-rat२०p११.jpg-
26O38508
दापोली ः महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींच्या निषेधार्थ आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या.
-------
महिला आरक्षणाला विरोध, दापोलीत निषेध
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २० ः महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा दापोली तालुका शिवसेनेच्यावतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.
शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या संयुक्त विद्यमाने हा निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्र सरकारने मांडलेल्या महिला आरक्षण विधेयकामुळे महिलांना निर्णय प्रक्रियेत अधिक प्रभावी भूमिका बजावण्याची संधी मिळणार असून, हे पाऊल देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले; मात्र, या सकारात्मक निर्णयाला काही घटक जाणीवपूर्वक विरोध करत असल्याने महिलांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला. अशा महिला विरोधी मानसिकतेचा तीव्र शब्दांत धिक्कार करत, नारीशक्तीचा सन्मान राखणे हेच आपले कर्तव्य असल्याची भूमिका पक्षाने स्पष्ट केली. या वेळी रोहिणी दळवी, दीप्ती निखार्गे, रसिका पेटकर, चारुता कामतेकर, नम्रता तोडणकर, प्रीती शिर्के, अश्विनी लांजेकर, नौशिन गिलगिले, उल्का जाधव आदी उपस्थित होत्या.
---
कोट
महिला आरक्षण विधेयक हे केवळ एक कायदा नसून, देशातील महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा अध्याय आहे. या विधेयकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्ती या महिलांच्या प्रगतीला अडथळा आणणाऱ्या आहेत. अशा विचारसरणीचा आपण ठामपणे विरोध करत असून, महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू.
- कृपा घाग, नगराध्यक्षा, दापोली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.