

rat२१p१२.jpg-
26O38701
खेड - महिला आरक्षणासंदर्भात खेडमध्ये काँग्रेसविरोधात आंदोलन करणारे शिंदे शिवसेनेचे महिला पदाधिकारी.
काँग्रेसविरोधात शिवसेनेचे रणकंदन
महिला आरक्षण विधेयक; महिला आघाडी आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २१ ः लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर, खेड येथे शिवसेना (शिंदे गट) तर्फे काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. या निर्णयाच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीने रस्त्यावर उतरून काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि परिसर दणाणून सोडला.
खेड येथे झालेल्या आंदोलनात शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो महिला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. काँग्रेसने आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका ही महिला शक्तीचा अपमान करणारी असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. आंदोलनादरम्यान महिलांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
माध्यमांशी बोलताना आंदोलक महिला पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘महिला आरक्षण ही केवळ राजकीय बाब नसून, समाजकारणात स्त्रियांचा सहभाग वाढवण्यासाठी ते एक महत्त्वाचे पाऊल आहे. आरक्षणामुळे महिलांना निर्णयप्रक्रियेत मोठी संधी उपलब्ध होणार असून, त्यांचा आवाज खऱ्या अर्थाने दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे; मात्र, यात अडथळे आणणाऱ्या शक्तींना महिला शक्ती धडा शिकवेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसने या विधेयकाला केलेल्या विरोधाच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. जर महिला आरक्षणाबाबत हीच नकारात्मक भूमिका राहिली तर आगामी काळात संपूर्ण जिल्ह्यात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या वेळी शिवसेनेच्यावतीने देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.