कोकण दौऱ्याचा अनुभव आयुष्यभर स्मरणात

कोकण दौऱ्याचा अनुभव आयुष्यभर स्मरणात
Published on

40249

कोकण दौऱ्याचा अनुभव आयुष्यभर स्मरणात

कृष्णराज महाडिक : मालवणात ‘भाजप’ची युवा शक्ती जागर यात्रा

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २८ : भाजप युवामोर्चाच्या युवा शक्ती जागर यात्रेचा कोकण प्रांतातील दौरा यशस्वीरित्या पार पडला. या जागर यात्रेतून युवकांना भावणाऱ्या विविध विषयांमध्ये काम करण्याचा प्रयत्न होणार आहे. कोकणचा अतिशय सुंदर कोकण दौऱ्याचा अनुभव आयुष्यभर विसरणार नाही, अशा भावना भाजप युवामोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी येथे व्यक्त केल्या.
भाजप युवा मोर्चा महाराष्ट्राचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष तथा सोशल मीडिया इंफ्लूएन्सर कृष्णराज धनंजय महाडिक हे युवा शक्ती जागर यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी मालवणला भेट दिली. या भेटीत महाडिक यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देऊन शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतले. राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास भेट देऊन शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी महाडिक यांचे भाजपा मालवण कार्यालय येथे भाजपा युवा मोर्चा मालवण शहराध्यक्ष तथा नगरसेवक ललित चव्हाण आदींनी स्वागत केले.
श्री. महाडिक म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युवाशक्ती जागर यात्रेची सुरुवात झाली. या कोकण प्रांतात फिरत असताना सर्व नेते मंडळींची भेट घेतली तसेच प्रामुख्याने सर्व युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटलो. या माध्यामातून एक संघटन बांधणी आम्हाला करायची आहे. युवा मोर्चाची टीम संघटना वाढीसाठी ताकदीने काम करत असल्याचे निदर्शनास आले. या यात्रेमध्ये फक्त राजकीय विषयच नाहीत तर युवकांना भावणाऱ्या प्रत्येक विषयामध्ये काम करण्याचे आम्ही ठरविले आहे. याच दृष्टीकोनातून सिंधुदुर्ग किल्ला तसेच राजकोट किल्ला याठिकाणी भेट दिली आहे. रॉक गार्डन येथे काँटेंट क्रिएटर सोबत चर्चा केली, कारण त्यांचे देखील काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांचे प्रश्न सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मला त्यांनी मार्गदर्शन केले. ना. नितेश राणे हे युवकांना प्रोत्साहित करत असतात. त्यांची काम करण्याची पद्धत सुंदर आहे, असेही श्री. महाडिक म्हणाले.
यावेळी युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, स्वप्नील काळे पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, नगरसेविका दर्शना कासवकर, महानंदा खानोलकर, नगरसेवक ललित चव्हाण, मंदार केणी, रविकिरण तोरसकर पं. स. सदस्य दीपक सुर्वे, तसेच भाई कासवकर, सेजल परब, अमृता फाटक, मनोज मेथर, पंकज सादये, लकी कांबळी, रोहन सावंत, सुमित सावंत, पंकज पेडणेकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com