

बालगोपाळांना सुटीत ग्रंथमित्र करणार
ॲड. दीपक पटवर्धन ः टेरेस वाचनालयाची संकल्पना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : मुलांसाठी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने वाचनाची गोडी लावून त्यांना ग्रंथमित्र बनवण्यासाठी योजना हाती घेतील आहे. या अंतर्गत शहरातील गृहनिर्माण संस्था, वाड्या-वस्त्यांमधील मुलांचे ग्रंथमित्र ग्रुप तयार करून त्यांची वाचनालयात नोंद केली जाईल. त्यानुसार त्या ग्रुपला बालवाचन साहित्य, पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. येत्या १० मे ते १० जून या कालावधीत ग्रंथालयाचा हा उपक्रम बालवाचकांसाठी सुरू राहील, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
शाळांच्या सुट्या सुरू झाल्या आहेत. बालगोपाळ सुखाचा मनमुराद आनंद लुटत आहेत. त्यांच्या या आनंदात भर घालण्यासाठी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय बालगोपाळांसाठी पुस्तक खजिना उपलब्ध करून देणार आहे. ग्रंथालयात नोंद करणाऱ्या ग्रुपला त्यातील बालवाचकांच्या संख्येनुसार गोष्टीरूप पुस्तके उपलब्ध करून दिली जातील. ही पुस्तके वाचून झाली की, पुन्हा दुसरी पुस्तके बदलून दिली जातील. या उपक्रमात सहभागी होऊन बालवाचकांनी एकत्र बसून वाचनाचा आनंद लुटावा अथवा ते शक्य नसल्यास ती आपल्या घरी नेऊन वाचावीत व ती वाचून झाली की, पुस्तकात काय वाचलं हे एका स्वतंत्र वहीत नोंद करून ठेवावे आणि उपक्रमाची मुदत संपताच या वह्या वाचनालयाकडे सादर करावयाच्या आहेत. वहीतील नोंदींचा आढावा घेऊन बक्षिसेही दिली जाणार आहेत.
वाचनालयात मुलांसाठी मराठी, इंग्रजी पुस्तकांचे भाग उपलब्ध आहेत. ज्यामध्ये हॅरीपॉटर, फास्टर फेणे, फेमस फाईव्ह आदींचा समावेश आहे. लहान गोष्टींच्या स्वरूपातील थोर व्यक्तित्व, समाजसुधारक यांचा परिचय करून देणारी पुस्तके, चातुर्यकथा, युद्धकथा, साहसकथा तसेच स्मार्ट रोबो-एआय आणि विज्ञानाची, एआयबाबतची जिज्ञासा वाढवणारी पुस्तके असा मुबलक ग्रंथखजिना ग्रंथालयात बालवाचकांची वाट बघत आहे.
----
मोफत वाचनालय
जवळच्या मुलांसाठी सकाळी ९.३० ते १२ व दुपारी ४ ते ६ या वेळेत मोफत वाचनालय सुरू ठेवण्यात येणार आहे. मुलांना प्रशस्त बसून वाचता यावे यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. ही मुलेही वरील उपक्रमातील नोंदवही स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहेत. त्यामुळे या सुटीत मुलांनी वाचनालयात येऊन आवडीची पुस्तके मनसोक्त वाचावीत व त्यावर व्यक्त व्हावे, असे आवाहन अध्यक्ष ॲड. पटवर्धन यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.