

- ratchl७१.jpg ः
26O41965
प्रा. नितीन पाटील
राष्ट्रपुरुषांचे विचार आचरणात आणा
प्रा. नितीन पाटील ः चिपळूणमध्ये व्याख्यानाला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ ः ‘छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांसारखे राष्ट्रपुरुष केवळ घोषणा देण्यासाठी नाहीत. त्यांच्या विचारांचा अभ्यास करून ते आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,’ असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. नितीन पाटील यांनी केले.
चिपळूण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे ‘राष्ट्रपुरुषांचा आदर्श आणि नव्या पिढीची जबाबदारी’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी सभागृह श्रोत्यांच्या गर्दीने भरले होते. ते म्हणाले, तरुणपिढीने कोणत्याही क्षेत्रात काम करताना सखोल अभ्यास, भविष्याचा विचार आणि नियोजनाची वृत्ती राष्ट्रपुरुषांकडून शिकली पाहिजे. आजचा तरुण मोबाईलवर गेम आणि रील्समध्ये वेळ घालवत आहे. तंत्रज्ञानाचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता ज्ञान आणि कौशल्य वाढवण्यासाठी करावा तर त्याचा फायदा तरुणाईला होईल. तरुणांनी केवळ नोकरी-पैशाच्या मागे न धावता इतिहास आणि ग्रंथांचे वाचन करावे. आभासी जगातून बाहेर पडून समाजासाठी योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला आमदार भास्कर जाधव, मोहन मिरगल, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, राजाभाऊ पाटणकर, रमण डांगे, समीर जानवलकर, नित्यानंद भागवत, शेखर सावले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.