भरधाव ट्रकची घराच्या संरक्षण कठड्याला धडक

भरधाव ट्रकची घराच्या संरक्षण कठड्याला धडक
Published on

ट्रकची संरक्षण कठड्याला धडक
पोफळीतील घटना; खुराड्याचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ : कऱ्हाड-चिपळूण मार्गावरील पोफळी-सय्यदवाडी येथे भरधाव ट्रकने घरासमोरील संरक्षण कठड्याला धडक दिल्याने कोंबड्यांचे खुराडे व सिमेंट पत्र्यांचे नुकसान झाल्याची घटना ५ मे रोजी दुपारी सव्वाच्या सुमारास घडली. या प्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोहसीन इब्राहिम सय्यद (३४, रा. पोफळी सय्यदवाडी क्र.१, ता. चिपळूण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आनंदा महिपती जाधव (वय ५२, रा. आगाशिवनगर, पवनचक्की शेजारी, कऱ्हाड, सातारा) हे ट्रकमधून कऱ्हाडहून चिपळूणकडे येत होते. पोफळी मौजे सय्यदवाडी क्र.१ येथील जामा मशिदीसमोर, चिपळूण-कऱ्हाड रस्त्यालगत मोहसीन सय्यद यांच्या घरासमोर आल्यानंतर रस्ता वळणाचा व उताराचा असल्याची माहिती असूनही चालकाने ट्रक बेदरकारपणे चालवला. त्यामुळे ट्रकने घरासमोरील संरक्षण कठड्याला जोरदार धडक दिली. या धडकेत पडवीत असलेले कोंबड्यांचे खुराडे तसेच सिमेंटचे पत्रे तुटून नुकसान झाले. या प्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात मोटारवाहन कायदा १९८८ मधील कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com