

42695
मराठीत ९४ हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण
विलास पाटणेः अभिजात दर्जा असूनही परिस्थिती गंभीर, अवांतर वाचन, शुद्धलेखन, वृत्तपत्र वाचन आवश्यक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. या निकालात मराठी विषयात तब्बल ९४ हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही विद्यार्थी मराठी भाषेत नापास होतात ही परिस्थिती गंभीर आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विलास पाटणे यांनी केले. कोकण शिक्षण मंडळाचा विचार करता प्रथम भाषा मराठी घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक टक्केवारी कोकणात आहे. २००३२ विद्यार्थ्यांनी मराठी प्रथम भाषा घेतली व त्यापैकी १९ हजार ७३६ म्हणजे उत्तीर्ण २९६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. ही टक्केवारी ९८.५२ टक्के आहे.
दोन वर्षापूर्वी ४० हजार विद्यार्थी नापास झाले होते. यावर्षी हा आकडा ९४ हजारावर गेला. मराठी शाळांमधील शिक्षकांची कमतरता, साधनसामग्रीचा अभाव, गुणवत्तेकडे दुर्लक्ष ही यामागची प्रमुख कारणे आहेत. केंद्र सरकारच्या ‘परख’ मूल्यमापन अहवालात महाराष्ट्राचा क्रमांक आठव्या स्थानावर गेला. रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याचा वाद ताजा असतानाच दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात चक्क ९४ हजार विद्यार्थी नापास झाले, ही मराठी भाषेची स्थिती दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषा विषयाचा निकाल ९२.५७ टक्के लागला आहे. जवळपास ८ टक्के विद्यार्थी मातृभाषेतच नापास झाले आहेत.
चौकट १
आकडे बोलतात...
* मराठी प्रथम भाषा म्हणून परीक्षा देणारे विद्यार्थी - १० लाख ८७ हजार ६९९
* नापास विद्यार्थी - ८० हजार ८०३
* मराठी द्वितीय आणि तृतीय भाषा निवडून परीक्षा देणारे विद्यार्थी ४ लाख १३ हजार ९१३
* नापास विद्यार्थी - १३ हजार ७४१
* मराठी भाषेत एकूण नापास विद्यार्थ्यांची संख्या - ९४ हजार ५४४
---------
चौकट २
काय करायला हवे
* विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवण्याची पद्धत आणि शिकवणाऱ्यांची क्षमता तपासणे
* शुद्धलेखनातील चुका आणि वाचनाच्या अभाव
* मराठीबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करा
* अध्यापन पद्धतीमध्ये बदल करावा.
* शुद्धलेखनाच्या चुका आणि घटलेला शब्दसंग्रहामुळे मराठीची परवड
* मराठी भाषा रोजच्या व्यवहाराची, शिक्षणाच्या माध्यमाची आणि जगण्याची भाषा व्हावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.