आयएएस अधिकारी होऊन सेवा करणार

आयएएस अधिकारी होऊन सेवा करणार
Published on

- rat१३p१४.jpg-
26O43214
समृद्धी आंबेकर

समृद्धी आंबेकर गुहागर तालुक्यात प्रथम
९९.२० टक्के गुण; आयएएस होऊन देशसेवेचे स्वप्न
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १३ : दहावीच्या परीक्षेत यश मिळवून गुहागर तालुक्यात प्रथम येण्याचा मान न्यू इंग्लिश स्कूल, पाटपन्हाळेची विद्यार्थिनी समृद्धी सुरेश आंबेकर हिने पटकावला आहे. तिला ९९.२० टक्के गुण मिळाले असून, भविष्यात भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होऊन देशसेवा करण्याचा निर्धार तिने व्यक्त केला आहे.
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाची समृद्धी सुरेश आंबेकर हिने आतापर्यंत निबंध लेखन, चित्रकला स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धा, विज्ञान प्रतिकृती सादरीकरण अशा विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये तालुकास्तरीय ते विभागस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यश मिळवले आहे. चतुरंग सर्वोत्तम गोडबोले पुरस्कार तसेच प्रा. जहूर बोट सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार समृद्धी आंबेकर हिने पटकावला. बालगटापासून ते इयत्ता दहावीपर्यंत कोणतीही खासगी शिकवणी नसताना स्वअध्ययनाने तिने हे यश मिळवले आहे. भविष्यात आयएएस होऊन उच्च अधिकारी होऊन सेवाकार्य करण्याचा मानस समृद्धी आंबेकर हिने व्यक्त केला आहे. तसेच नियमित वाचन, दैनंदिन अभ्यास, नियोजनबद्ध अभ्यासवृत्ती, अभ्यासाची उजळणी, लेखनाचा सराव, चिंतन व मनन यामुळेच दहावीमध्ये यश लाभले आहे, असे समृद्धी आंबेकरने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com