

माभळे येथे
रिक्षा दरीत कोसळली
खारेपाटण, ता. १५ ः संगमेश्वर-उजगाव मार्गावरील माभळे येथे बुधवारी (ता. १३) मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षा घसरून दरीत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने चालक आणि रिक्षातील प्रवाशांनी प्रसंगावधान राखत वेळीच उडी मारल्याने मोठी जीवितहानी टळली.
संगमेश्वर-उजगाव मार्गावरील माभळे ते सडा या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम मंजूर झाले आहे. काम सुरू करण्यापूर्वी ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करून ठेवले होते. पहिल्याच पावसात ही माती रस्त्यावर वाहून आल्याने संपूर्ण रस्ता चिखलमय व घसरडा बनला आहे.
ग्रामस्थांनी याबाबत ठेकेदाराला वारंवार सूचना दिल्यानंतर गटार काढण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, योग्य सुरक्षितता आणि नियोजनाचा अभाव असल्याने रस्ता अधिकच धोकादायक बनल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. बुधवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास उजगाव येथील कानसरे हे रिक्षाचालक प्रवाशांसह घरी जात असताना रिक्षा अचानक घसरली आणि थेट दरीत कोसळली. चालक व प्रवाशांनी वेळीच उडी मारल्याने त्यांचे प्राण वाचले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.