

ओरोसला आज आर्थिक साक्षरता व्याख्यान
ओरोस, ता. २२ : योग्य आर्थिक गुंतवणूक आणि सायबर फसवणुकीपासून सावधानता याबाबत जागृती करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सिंधुदुर्गनगरी शाखेच्या शाखा व्यवस्थापक गौतमी महाजन यांचे ‘सुरक्षित गुंतवणूक, आर्थिक साक्षरता आणि सायबर सुरक्षा’, या विषयावर व्याख्यान उद्या (ता.२३) सायंकाळी ५ वाजता येथे होईल. घुंगुरकाठी स्वयंसेवी संस्थेने येथील दत्तराज सोसायटीच्या सभागृहात याचे आयोजन केले आहे. आजकाल बहुतेक सर्व आर्थिक व्यवहार रोखीने न होता डिजिटली आणि ऑनलाईन होत आहेत. अशा व्यवहारात बऱ्याचदा अज्ञानामुळे अनेकांची फसवणूक होते. सायबर क्राईम करणारे सर्वसामान्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतात आणि लूट करतात. या पार्श्वभूमीवर जागृतीसाठी या मार्गदर्शनाचे आयोजन केले आहे. याला उपस्थित रहावे, असे आवाहन ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.