दोडामार्ग, देवगड रुग्णालयाचे श्रेणीवर्धन

दोडामार्ग, देवगड रुग्णालयाचे श्रेणीवर्धन
Published on

46593


दोडामार्ग, देवगड रुग्णालयाचे श्रेणीवर्धन
उपजिल्हाचा दर्जा : नव्या पदांना मिळाली मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २५ : जिल्ह्यातील देवगड आणि दोडामार्ग येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात आले आहे .तेथे आवश्यक असणाऱ्या नवीन पदांनाही मंजुरी देत शासनाने यावर अधिकृत मोहर लावली आहे. त्यामुळे येथील आरोग्य सेवा अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.
राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सर्वसामान्यांना सुलभ आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ५० टक्के व त्यापेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या राज्यातील नवनिर्मित तसेच श्रेणीवर्धित २५९ आरोग्य संस्थांसाठी आवश्यक असणाऱ्या पदनिर्मितीस शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणेला खूप मोठी बळकटी मिळणार आहे. या निर्णयांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड आणि दोडामार्ग येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात आले असून, तेथे आवश्यक असणाऱ्या नवीन पदांनाही मंजुरी देण्यात आली आहे.

दृष्टिक्षेपात...

राज्यातील २५९ आरोग्य संस्थांसाठी आवश्यक ७,९५५ पदांचा आकृतीबंध मंजूर.
यापूर्वी २,७३२ पदांना मंजुरी देण्यात आली होती.
आता उर्वरित ५,२२३ पदांनाही मान्यता.
ग्रामीण आरोग्य संस्थांचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू होण्याचा मार्ग मोकळा.
देवगड आणि दोडामार्ग रुग्णालयांचे ३० खाटांवरून ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर

नागरिकांना मिळणारे फायदे

अधिक तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता.
वाढीव खाटांची सुविधा.
आधुनिक वैद्यकीय उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध.
गंभीर रुग्णांना जिल्ह्याबाहेर हलविण्याची गरज कमी.
उपचारासाठीचा वेळ आणि खर्च वाचणार.

आरोग्य सेवेला नवे बळ

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होणार.
प्राथमिक उपचारांपासून तातडीच्या वैद्यकीय सेवांपर्यंत सुविधा उपलब्ध.
दुर्गम व डोंगराळ भागातील नागरिकांना मोठा दिलासा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा मिळण्यास मदत.


--------------------
चौकट
अशी असेल पद रचना

या श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालयांचे दैनंदिन कामकाज अधिक सुलभ, शिस्तबद्ध आणि गतिमान पद्धतीने चालण्यासाठी विविध संवर्गातील खालील पदांना मंजुरी देण्यात आली आहे:
वैद्यकीय अधिकारी (शस्त्रक्रिया) गट-अ, वर्ग-२ – १ पद
वैद्यकीय अधिकारी (भिषक) गट-अ, वर्ग-२ – १ पद
वैद्यकीय अधिकारी गट-अ, वर्ग-२ – २ पदे
सहाय्यक अधिसेविका वर्ग-३ – १ पद
परिसेविका वर्ग-३ – २ पदे
अधिपरिचारिका – ५ पदे
औषध निर्माता / निर्माण अधिकारी – २ पदे
वरिष्ठ लिपिक वर्ग-३ – १ पद
बाह्यरुग्ण सेवक वर्ग-४ – १ पद
शस्त्रक्रियागृह परिचर – १ पद
कक्षसेवक – १ पद
व्रणोपचारक – १ पद
शिपाई – १ पद
--------------

कोट
दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीनंतर आता नवीन पदांची मंजुरी मिळाल्याने तालुक्यातील भक्कम आरोग्य सेवेचा मार्ग अखेर खुला झाला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी पालकमंत्री नितेश राणे, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार दीपक केसरकर यांचे मी मनापासून आभार मानतो. नुकताच श्री केसरकर यांनी दोडामार्ग येथे भेट देऊन कामाचा आढावा घेतला होता. या नव्या निर्णयाचा तालुक्याला फायदा होईल.
- गणेशप्रसाद गवस, उपसभापती, पंचायत समिती, दोडामार्ग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com