तळवडे स्कूलचे स्पेल बी स्पर्धेत यश

तळवडे स्कूलचे स्पेल बी स्पर्धेत यश
Published on

swt517.jpg
55445
तळवडे : हस्ताक्षर, चित्रकला स्पर्धेत यश मिळविलेले विद्यार्थी.

तळवडे स्कूलचे
स्पेल बी स्पर्धेत यश
विविध वयोगटातील विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ : हस्ताक्षर आणि चित्रकला स्पर्धेत तळवडे इंग्लिश मेडीयम स्कूल, तळवडेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन सुवर्णपदके पटकावली.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत लहानग्यांपासून ते मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हस्ताक्षर आणि चित्रकला या दोन्ही क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करून परीक्षकांचे कौतुक मिळवले. शाळेत आयोजित एका विशेष कार्यक्रमात सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान दिसून येत होता.
विजेते विद्यार्थी असे : सहावी - शुभ्रा राऊळ हिला हस्ताक्षर स्पर्धेत गोल्ड मेडल, आर्या रेडकर हिला चित्रकला स्पर्धेत गोल्ड मेडल. चौथी - आर्य बुगडेला चित्रकला स्पर्धेत गोल्ड मेडल, प्रांजल जळवी याला हस्ताक्षर, चित्रकला स्पर्धेत गोल्ड मेडल, पुर्वांग परब याला हस्ताक्षर स्पर्धेत गोल्ड मेडल, स्पर्श सावंत-भोसले याला चित्रकला स्पर्धेत गोल्ड मेडल, दिया वजरकर याला चित्रकला स्पर्धेत गोल्ड मेडल, ईशिता नाईक हिला चित्रकला स्पर्धेत गोल्ड मेडल, राजवीर पवार (ज्यूनियर केजी) याला गोल्ड मेडल.
दुसरी : अनुज शिरोडकर याला चित्रकला स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाले आहे. इतर स्पर्धेतील विजेते असे : कौस्तुभ तळवणेकर - चित्रकला स्पर्धा, स्वरा दळवी - चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धा, राज पिकुळकर - हस्ताक्षर स्पर्धा, अक्षरा कापडी - चित्रकला स्पर्धा, पर्णिका बंदिवडेकर - चित्रकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com