

- rat५p२१.jpg-
26O55448
रत्नागिरी ः जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेतील विजयी, उपविजयी स्पर्धकांसह प्रमुख पाहुणे.
----
अभिषेक चव्हाणला दुहेरी मुकुट
जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा ; महिला गटात निधी सप्रेचे वर्चस्व
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः रत्नागिरीतील श्री मारुती-गणपती पिंपळपार देवस्थान, टिळक आळी, गणेशोत्सव मंडळ आयोजित रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीच्या अभिषेक चव्हाणने दुहेरी मुकुट पटकावला. तसेच महिला गटात राजापूरच्या निधी सप्रे हिने आंकाक्षा कदमला पराभूत करून विजेतेपद पटकावले.
रत्नागिरीत झालेल्या या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातून सर्व गटातून सुमारे २५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात राष्ट्रीय खेळाडू रत्नागिरीच्या अभिषेक चव्हाण याने चिपळूणच्या दिपक वाटेकर याच्यावर २५-१०, १८-२५, २५-१६ अशा संघर्ष पूर्ण सामन्यात मात करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या रियाज अकबर अली व अभिषेक चव्हाण या जोडीने चिपळूणच्या अभिजित खेडेकर व दीपक वाटेकर या जोडीचा १५-०४, २०-०० असा पराभव करून पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. पुरुष वयस्कर गटात देवरूखच्या राहुल भस्मेने राष्ट्रीय खेळाडू संतोष जोगळेकर यांचा संघर्षपूर्ण लढतीत २५-०४, १४ - १७,२५-०१ तर महिला एकेरी गटात आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा कदम हिचा राजापूरच्या निधी सप्रे हिने २५-१४, २५-१० असा पराभव करून अनुक्रमे पुरुष वयस्कर व महिला गटाचे विजेतेपद पटकाविले. किशोर गट (मुले) या गटात आदित्य देसाई ( लांजा ) याने हर्ष कदम ( गुहागर ) याचा २५-००, २५-०१ तर कुमार गट (मुले) या गटात ओम पारकर ( रत्नागिरी ) याने आर्यन राऊत (गुहागर) याचा पराभव करून त्या त्या गटाचे विजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण मंडळाचे विश्वस्त अरुण करमरकर, माजी सेक्रेटरी राहुल काळे, भाऊ तेरेदेसाई, स्पर्धा प्रमुख मनोहर केळकर, अध्यक्ष प्रदीप भाटकर, नितीन लिमये, विवेक देसाई, विनय गांगण, सचिन बंदरकर, मंदार दळवी, सागर कुलकर्णी व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.