

-rat६p१९.jpg-
26O55655
संगमेश्वर ः कसबा हायस्कूलजवळील धोकादायक मोरी.
---
जीर्ण मोरीने वाढवली धास्ती
कसबा हायस्कूलजवळील वास्तव; अपघाताची भीती
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ७ ः संगमेश्वर-नायरी मार्गावरील कसबा हायस्कूलजवळ (कसबा मोहल्ला) असलेली मोरी अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचली असून, ती कधीही खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मुख्य मार्गावरून दररोज एसटी बसेससह अवजड वाहनांची मोठी वर्दळ सुरू असल्याने एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
संगमेश्वर-कसबा- नायरी हा मार्ग नायरी, शृंगारपूर, फणसवणे आणि तांबडी या गावांना जोडणारा एकमेव महत्त्वाचा दुवा आहे. ऐतिहासिक कर्णेश्वर मंदिर, रामेश्वर पंचायत क्षेत्र आणि छत्रपती संभाजी महाराज स्मारक या प्रमुख ठिकाणांकडे जाणारे नागरिक व पर्यटक याच मार्गाचा वापर करतात.
कसबा मोहल्ला परिसरातील या मोरीला मोठे तडे गेले असून, अवजड वाहनांमुळे तिच्यावर अतिरिक्त ताण येत आहे. जर ही मोरी पूर्णपणे खचली तर परिसरातील ५ ते ६ गावांचा थेट संपर्क तुटणार असून, याचा फटका विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि पर्यटकांना बसणार आहे. संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी पीडब्ल्यूडी विभागाने या जागेची तातडीने पाहणी करून मोरीची दुरुस्ती अथवा नवीन उभारणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.