

आयएमएचा बंद मागे,
आरोग्यसेवा सुरळीत
रत्नागिरी, ता. ७ ः न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पुकारलेले राज्यव्यापी सेवा बंद आंदोलन अखेर मागे घेतले आहे. त्यामुळे आरोग्यसेवा पूर्ववत झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सहाशेहून अधिक खासगी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलन स्थगित झाल्यामुळे वैद्यकीय सेवा सुरळीत झाली आहे.
राज्य सरकारने काढलेल्या एका शासननिर्णयाच्या अंमलबजावणीवरून तसेच सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी चिकित्सकांच्या नोंदणीच्या मुद्द्यावरून आयएमए आणि प्रशासनात तीव्र मतभेद निर्माण झाले होते. या निर्णयाविरोधात आयएमएने आक्रमक भूमिका घेत राज्यभर वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला होता; मात्र, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मुंबई उच्च न्यायालयाने यात स्वतःहून दखल घेतली. न्यायालयाने ३ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासननिर्णयाची तत्काळ व संपूर्ण अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्यशासनाला दिले.
याशिवाय, बीएचएमएस सीसीएमपी नोंदणीसाठी एक मानक कार्यपद्धती तयार करण्यासाठी सर्व संबंधित घटकांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे स्पष्ट आदेशही न्यायालयाने जारी केले. न्यायालयाच्या या सकारात्मक भूमिकेचा आणि प्रभारी मुख्य न्यायमूर्तींच्या आवाहनाचा आदर राखत आयएमए महाराष्ट्र राज्याच्यावतीने आपले आंदोलन तत्काळ प्रभावाने मागे घेत असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. सर्व सदस्य, वरिष्ठ सल्लागार आणि माध्यमांच्या सहकार्यामुळे हा तोडगा शक्य झाल्याची भावना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.