‘मत्स्य संशोधन’चे कामकाज आश्वासक

‘मत्स्य संशोधन’चे कामकाज आश्वासक
Published on

56015

‘मत्स्य संशोधन’चे कामकाज आश्वासक

आयुक्त टेमकर ः मुळदे उद्यानविद्याच्या प्रशिक्षण केंद्राला भेट

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ८ : मुळदे येथील गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या विकासासाठी मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त गणेश टेमकर यांनी दिली. केंद्रात सुरू असलेल्या मत्स्य संशोधन, प्रशिक्षण व मत्स्यबीजोत्पादनाच्या कामाची पाहणी करताना त्यांनी केंद्राच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या नेतृत्वाखाली विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता. ७) उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे (ता. कुडाळ) येथील गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन व प्रशिक्षण केंद्रास भेट दिली. यावेळी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे जिल्हा समन्वयक बहर महाकाळ, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गणेश टेमकर, उत्कर्षा कीर, तृप्ती जाधव, भक्ती पेजे, सोनल तोडणकर व शीतल कांबळे उपस्थित होते.
प्रकल्प प्रमुख कल्पेश शिंदे यांनी केंद्रामार्फत सुरू असलेल्या मत्स्य संशोधन, प्रशिक्षण व मत्स्य व्यवसाय विकासाच्या उपक्रमांची माहिती दिली. केंद्राची सद्यस्थिती, भविष्यातील नियोजन तसेच विद्यापीठ आणि राज्य शासनाच्या ''चांदा ते बांदा'' व ''सिंधुरत्न'' योजनांतर्गत प्राप्त निधीच्या विनियोगाची माहितीही त्यांनी दिली.
केंद्राच्या वार्षिक मत्स्यबीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत भारतीय प्रमुख कार्प प्रजाती रोहू व कटला यांच्या नर-मादी माशांना त्यांच्या वजनानुसार प्रेरित प्रजननासाठी आवश्यक इंजेक्शनचा डोस देण्याची प्रात्यक्षिक प्रक्रिया यावेळी करण्यात आली. सहाय्यक आयुक्तांसह उपस्थित अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. या निमित्ताने मत्स्यशास्त्राच्या विद्यार्थीदशेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
मत्स्य महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच मत्स्यशेतकऱ्यांना एकाच ठिकाणी मत्स्य संवर्धनाची माहिती आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिके घेण्याची संधी मिळत असल्याने विद्यापीठ व राज्य शासनाच्या निधीचा योग्य व सार्थ विनियोग होत असल्याचे सहाय्यक आयुक्तांनी नमूद केले. मनुष्यबळाची कमतरता असतानाही मत्स्यसंवर्धनासाठी आवश्यक सुविधा आणि विविध नाविन्यपूर्ण घटकांचा समावेश करून केंद्राचे कामकाज चांगल्या प्रकारे सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
भविष्यात शासकीय विभागाच्या माध्यमातून केंद्राच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. उपस्थित अधिकाऱ्यांनीही केंद्राला दिलेली भेट सुखद व प्रेरणादायी ठरल्याचे सांगत भविष्यातील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक विनय सहस्त्रबुद्धे, तांडेल दीपक वाघ, कुशल मासेमार सत्यवान मालोंडकर, कंत्राटी कर्मचारी पंकज गावडे, कार्यालय सहाय्यक समीक्षा अणसुरकर तसेच संदीप सावंत, सुभाष सावंत, पांडुरंग कासवेकर, प्रज्योत पणदूरकर आणि सर्वेश धुरी यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com