‘कायदा पालन’ राष्ट्रकार्याचाच भाग

‘कायदा पालन’ राष्ट्रकार्याचाच भाग
Published on

56017

‘कायदा पालन’ राष्ट्रकार्याचाच भाग

ए. जी. देशिंगकर ः पाट हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ८ ः गैरकृत्यापासून कटाक्षाने लांब राहा. आई-वडिलांचा आदर करा. कायद्याचे पालन करणे आपल्या आयुष्याचा एक भाग आहे; असा अनमोल संदेश जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश ए. जी. देशिंगकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट पंचक्रोशी संचलित एस. एल. देसाई विद्यालय व (कै.) एस. आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांतर्गत कायदेविषयक मार्गदर्शनपर कार्यक्रम न्यायाधीश देशींगकर व ॲड. प्रणिता कोटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. स्वतःचे ध्येय निश्चित करा. अभ्यास करा. कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अडकणार नाही यासंदर्भात स्वतःची काळजी घ्या, असा अनमोल संदेश तसेच बालक लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (पोक्सो) याविषयी ओघवत्या शैलीत अॅड. कोटकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
श्री. देशिंगकर व ॲड. कोटकर यांचा संस्था पदाधिकारी तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक सयाजी बोंदर, ज्येष्ठ शिक्षिका दीपिका सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर संस्था सचिव विजय ठाकूर, खजिनदार दीपक पाटकर, सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सामंत, ऋतुजा पाटकर, शरयू राऊळ, नीलेश वर्णे, श्वेता सावंत, विधी सेवा स्वयंसेवक गुरुनाथ दामले, मुख्याध्यापक सयाजी बोंदर, पर्यवेक्षिका अंकिता मोडक, ज्येष्ठ शिक्षिका दीपिका सामंत, जान्हवी पडते, यज्ञा साळगांवकर, संदीप साळसकर उपस्थित होते. मुख्याध्यापक सयाजी बोंदर यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक प्रतिनिधी संदीप साळसकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com