

rat९p१०.jpg-
५६१४९
लांजाः पोलीस ठाण्यात आयोजित बैठकित मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे.
सण शांततेत व सलोख्याने साजरा करा
निळकंठ बगळे ; लांजा येथे ईदच्या पार्श्वभूमीवर बैठक
लांजा, ता. ९ ः आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर लांजा तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लांजा पोलीस ठाण्यात मुस्लिम समाजातील प्रमुख पदाधिकारी व प्रतिनिधींची विशेष बैठक पार पडली. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. ८) ही बैठक झाली.
येत्या २६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद सण सर्वत्र उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर बैठकीत मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी मिरवणूक व धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. मिरवणुकीचे निश्चित केलेले मार्ग, वेळेचे बंधन आणि ध्वनीप्रदूषणासंदर्भातील शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करावे. तसेच मिरवणुकीदरम्यान मुख्य मार्गावरील वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
"ईद-ए-मिलाद हा सण आनंद आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता व बंधुभाव कायम राखावा आणि काही संशयास्पद बाबी आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा," असे आवाहन पोलीस निरीक्षक बगळे यांनी केले. पोलीस प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून दरवर्षीप्रमाणे यंदाही ईद-ए-मिलाद अत्यंत शांततेत, शिस्तीत आणि सर्वधर्मीय बंधुभाव जपत साजरी केली जाईल, अशी ग्वाही बैठकीस उपस्थित असलेल्या मुस्लिम समाजातील पदाधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.