

56318
गांगोमाऊली गोविंदा पथकाचे थरावर थर
फोंडाघाटमध्ये प्रात्यक्षिक; दहीहंडी उत्सवाची जय्यद तयारी सुरू
सकाळ वृत्तसेवा
फोंडाघाट, ता. ९ : फोंडाघाटमध्ये दहिहंडी उत्सवासाठी गोविंदा पथके सज्ज होत आहेत. यात फोंडाघाट येथील गांगोमाऊली गोविंदा पथकाच्या सरावाचा शुभारंभ सुनील आणि सुधाकर सावंत बंधू यांच्या पटांगणात आज मोठ्या उत्साहात करण्यात आला.
या शुभारंभावेळी शिवसेनेचे उपनेते संजय आग्रे, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, पंचायत समिती सदस्य पवन भालेकर, संदेश पटेल, भामा सावंत, छोटू सावंत, विलास लाड, बंडुनाना, संजय सावंत, बाळा भिरवंडेकर, हेमंत कोंडेकर, रामभाऊ घाडगे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गोविंदा पथकाच्या सरावाचा प्रारंभ करण्यात आला. तसेच पथकाच्या जर्सीचे आणि बॅनरचे फीत कापून उद्घाटन केले. यात सरावाच्या पहिल्याच दिवशी चार थरापर्यंत मानवी मनोरे रचण्यात पथक यशस्वी झाले. यात सर्वांत वरच्या थरावर चढलेल्या गोविंदा यज्ञेश गुरव याचा आग्रे यांच्या हस्ते गौरव केला. तसेच पथकाला मार्गदर्शन करणारे विशू घाडगे यांचाही सन्मान झाला. जोईल सर यांनी सूत्रसंचालन केले. पथकाचे अध्यक्ष अनिल शेळके यांनी आभार मानले.
---
गोविंदा पथक असे...
दहिहंडीच्या मानवी मनोरे थरासाठी गोविंदा पथकातील अनिकेत सावंत, मुकेश सावंत, दीपक जोईल, प्रतीक जोईल, सुनील जोईल, समीर लाड, नितेश गुरव, रुपेश चव्हाण, रामभाऊ घाडगे, शुभम सावंत, संदीप जोईल, ऋतिक जोईल, स्वप्निल घाडगे, निमिष सावंत, मनोज सावंत, प्रदीप सावंत, विजय लाड, कीर्तीराज जोईल, रुपेश कदम, नामदेव करुळकर, अवधूत जोईल, हर्षद (सोनू) सावंत, निवृत्ती जोईल, आबा जोईल, बाळा खांबाळेकर, संतोष सावंत आदी मेहनत घेत आहेत.
---
गोविंदा पथकांनी काय काळजी घ्यावी?
मानवी मनोरे रचताना सुरक्षिततेला प्राधान्य द्या. उंचीपेक्षा गोविंदांच्या सुरक्षिततेला महत्त्व द्यावे. प्रशिक्षित गोविंदांचाच सहभाग असावा. नवख्या गोविंदांना थेट उंच थरावर चढवू नये. लहान मुलांना उंच थरावर पाठवू नये. हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, गुडघे व कोपर संरक्षक साधनांचा वापर करावा.
मनोऱ्याभोवती सुरक्षाजाळी, गादी किंवा मॅटची व्यवस्था करावी. पावसामुळे जमीन निसरडी असल्यास सराव किंवा मनोरा रचणे टाळावे. अपघात झाल्यास तातडीने वैद्यकीय मदत मिळेल, अशी व्यवस्था आधीच करावी. मद्यपान करून सहभाग घेऊ नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.