

सावंतवाडीत शुक्रवारी
आधार कार्ड दुरुस्ती
ओटवणे ः सावंतवाडी पोस्ट खात्यामार्फत अपघात विमा तसेच आधारकार्डमध्ये मोबाईल नंबर, नाव, पत्ता दुरुस्त व अद्ययावत करण्यासाठी शुक्रवारी (ता. १४) सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सावंतवाडी शहरातील उभाबाजार, सुवर्णपेठ या ठिकाणी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. सावंतवाडी पोस्टमास्टर प्रकाश गावडे व सहाय्यक पोस्टमास्तर जयराम बोवलेकर यांचे या शिबिरासाठी सहकार्य लाभणार आहे. या शिबिरात विविध अपघाती विमा पोस्ट खात्यामाफत नागरिकांना काढून दिला जाणार आहे. शिबिराच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन सावंतवाडी येथील जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केले आहे.
----
ओरोसला शुक्रवारी
‘दुर्गा-षष्टी’ नाटक
ओरोस ः ओरोस गावचे ज्येष्ठ वारकरी व ज्येष्ठ नाट्य कलावंत चंद्रकांत ओरोसकर (चंदू काका) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शुक्रवारी (ता. १४) सायंकाळी ७ वाजता श्री देव रवळनाथ रंगमंच, ओरोस बुद्रुक येथे ‘दुर्गा-षष्टी’ या दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे. सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ (नेरुर) नाट्यप्रयोग सादर करणार आहे. ओरोस ग्रामस्थ व्यवस्थापनाने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. लाभ घेण्याचे आवाहन ओरोस ग्रामस्थांनी केले आहे.
.....................
तुळस वाचनालय
अध्यक्षपदी परब
वेंगुर्ले ः तुळस येथील श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालयाच्या अध्यक्षपदी विवेकानंद उर्फ बापू परब यांची श्री देव जैतिराश्रित संस्था मुंबईच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्टरित्या कामगिरी बजावलेले सगुण माळकर यांचे निधन झाल्याने हे पद रिक्त झाले होते. त्या पदावर परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परब गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेचे सक्रिय सदस्य म्हणून निःस्वार्थपणे कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
........................
उभादांडा कुर्लेवाडीत
धार्मिक कार्यक्रम
वेगुर्ले ः उभादांडा कुर्लेवाडी येथील सद्गुरू नारायण महाराज गोंदेकर यांचा ७४ वा पुण्यतिथी उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. यानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उद्या (ता. ११) पहाटे काकड आरती, सकाळी १०.३० वाजता श्रींचा पुण्यकाळ, पादुकांवर पंचामृत अभिषेक, ११.३० वाजता सावळाराम कृष्णा कुर्ले महाराज यांचे काल्याचे कीर्तन, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
---
सेवानिवृत्त कर्मचारी
संघाची आज सभा
सावंतवाडी ः सावंतवाडी-दोडामार्ग तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघाची मासिक सभा उद्या (ता. ११) सकाळी १०.३० वाजता येथील सद्गुरू अपार्टमेंट, सालईवाडा येथे आयोजित केली आहे. सदस्य, सभासद, संचालक मंडळ, कार्यकारी मंडळाने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष पणदूरकर व सचिव संभाजी कांबळे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.