

56366
दीपक देसाई
राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्षपदी देसाई
दोडामार्ग : राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी दीपक देसाई यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे किसान सभा प्रदेशाध्यक्ष ॲड. वसंतराव मनकर यांनी तसे पत्र देऊन ही घोषणा केली. ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. श्री. देसाई यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात मनसेमधून केली. ते दीर्घकाळ तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विविध पदावर कार्यरत आहेत. शासनाच्या कृषी विषयी विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांचा कायम प्रयत्न असतो. हेच काम पाहून ही नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे ध्येय-धोरण सर्वसामान्यांपर्यंत आणि शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्या यासाठी प्रयत्न असेल, असेही ते म्हणाले.