

rat१०p१३.jpg-
५६३६४
रत्नागिरी : डाकघर अधीक्षक कार्यालयात सामंजस्य करार करताना डावीकडून महानगर गॅसचे प्रमुख आशिष प्रसाद व डाकघर अधीक्षक ज्ञानेश्वर कुलकर्णी.
----------------
महानगर गॅसचे बिल भरण्याची पोस्टात सुविधा
टपाल विभागाशी सामंजस्य करार; १२ हजार ग्राहकांना फायदा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : शहरात जवळपास १० ते १२ हजार ग्राहकांकडे महानगर गॅस सुरू आहे. या गॅसचे बिल भरण्याकरिता शहरात फक्त ऑनलाइन व कार्यालयात जाऊन पैसे भरण्याची सुविधा होती. यामुळे ग्राहकांची होणारी गैरसोय टाळण्याकरिता महानगर गॅस व टपाल विभागाने सामंजस्य करार केला असून आता शहरातील सर्व टपाल कार्यालयात बिल भरणा सुविधा सुरू झाली आहे. डाकघर अधीक्षक ज्ञानेश्वर कुलकर्णी आणि महानगर गॅसचे प्रमुख आशिष प्रसाद यांनी आज सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही अधिकाऱ्यांनी माहिती दिली. महानगर गॅसचे ग्राहक वाढत असून ते शहराच्या विविध भागांमध्ये वास्तव्यास आहेत. त्यामुळे विद्यमान बिल भरणा केंद्रापर्यंत जाणे काही ग्राहकांसाठी गैरसोयीचे ठरत होते. ही अडचण लक्षात घेऊन महानगर गॅसने भारतीय डाक विभागाशी संपर्क साधून डाक कार्यालयाच्या माध्यमातून बिल भरण्याची सुविधा सुरू करण्याची प्रायोगिक प्रणाली पडताळण्यात आली. डाक विभागाचे व्यापक नेटवर्क आणि नागरिकांशी असलेले दैनंदिन संर्पकाचे नाते लक्षात घेता, या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.
या करारामुळे रत्नागिरी शहरातील सर्व टपाल कार्यालयात महानगर गॅसची मासिक बिल भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामध्ये रत्नागिरी प्रधान डाकघर, रत्नागिरी कलेक्टरेट एस. ओ., शिवाजीनगर एस. ओ., एमआयडीसी (रत्नागिरी) एस. ओ. तसेच शहरातील इतर सर्व टपाल कार्यालयांचा समावेश आहे. ग्राहकाचे जेवढे बिल आहे तेवढेच भरून घेतले जाईल. टपाल कार्यालयात फक्त बिल भरण्याचा विषय असून, गॅस पुरवठा संबंधीच्या तक्रारी महानगर गॅसच्या कार्यालयात ऐकून घेतल्या जातील, अशी माहिती आशिष प्रसाद यांनी दिली.
चौकट १
डाक विभागात नवीन सुविधा
भारतीय डाक विभागामार्फत नागरिकांना स्पीडपोस्टद्वारे देश-विदेशात टपाल व राखी पाठवणे, पार्सल पिकअप् सेवा, टपाल जीवनविमा, विविध बचत योजना, लॉजिस्टिक सेवा, पासपोर्ट सेवा, आधार नोंदणी व अद्ययावत करण्याची सुविधा अशा विविध नागरिक-केंद्रित सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या सुविधांमध्ये आता महानगर गॅस बिल भरणा सेवेचीही भर पडली आहे. भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजेशी संबंधित विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना या सुविधेमुळे आणखी बळकटी मिळणार आहे.
कोट
लवकरच महानगर गॅसचे बिल पोहोचवण्याची सेवाही पोस्टमनमार्फत सुरू होणार आहे. तसेच गॅसचे रिडिंग घेण्याकरिता पोस्टमन काम करणार आहेत. ज्या वेळी पोस्टमन बिल पोहोचवण्याकरिता येतील त्याच वेळी त्यांच्याकडे बिल भरणाही करता येण्याच्यादृष्टीने ग्राहकांना सुविधा देण्याचा विचार आहे.
- ज्ञानेश कुलकर्णी, डाकघर अधीक्षक, रत्नागिरी विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.