रत्नागिरी- जिल्ह्यात तुलनेत 100 मिलीमिटर कमी पाऊस

रत्नागिरी- जिल्ह्यात तुलनेत 100 मिलीमिटर कमी पाऊस
Published on

rat१०p१५.jpg
56410
राजापूर ः आडिवरे येथे कातळावरील तरारलेली हिरवीगार भातशेती. (मकरंद पटवर्धन ः सकाळ छायाचित्रसेवा)
----------------------
सरासरीपेक्षा १०० मिलिमीटर कमी पाऊस
संगमेश्वर तालुक्यात सर्वात कमी; अनियमितेमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेंत वाढ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः जिल्ह्यात १ जूनपासून १० ऑगस्टपर्यंत सरासरी २०५८.५१ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. एकूण सरासरीच्या ६१.१९ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत २१६३.८१ मिमी पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत १०० मिमी कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यातील दमदार आगमनामुळे रखडलेल्या भातलावणीची कामे पूर्ण झाली आहेत; परंतु ऑगस्ट महिन्यातील अनियमित पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.
यंदा अलनिनोमुळे जूनपासूनच पावसामध्ये सातत्य नाही. जून, जुलै, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेड तालुक्यात सर्वाधिक ७३.९९ टक्के पाऊस झाला आहे तर रत्नागिरी तालुक्यात सर्वात कमी ६० टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत राजापूर, लांजा आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्ये यंदा पावसाचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे. ही चिंतेची बाब असून, त्याचे परिणाम भातशेतीवर होणार आहेत. जूनमध्ये पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सुरवातीला भातशेती संकटात सापडली होती. तसेच नाचणी आणि वरी पिकांच्या लावणीलाही काहीसा विलंब झाला होता. जुलैच्या दमदार पुनरागमनानंतर लावणीची कामे वेगाने पूर्ण झाली असली, तरी भातपिकाला सतत पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे सध्या पडणारे ऊन आणि पावसाची उघडीप पाहता पुढील दोन महिने पावसाची साथ कशी राहते, यावरच शेतीच्या उत्पादनाचे गणित अवलंबून असणार आहे.

चौकट
56448
१ जून ते १० ऑगस्टपर्यंतचा तालुकानिहाय पाऊस (मिलीमिटर)
-----------------------------------------------------------------
तालुका सन २०२६ सन २०२५
----------------------------------------------------------------------
* मंडणगड २३२०.७५ २१६१.००
* दापोली २२६३.३७ २०४३.७२
* खेड २५९७.७४ २५३९.४२
* गुहागर १७७२.९२ १६२२.८३
* चिपळूण २४७४.०९ २४८८.०७
* संगमेश्वर १७८७.३१ २२७७.६४
* रत्नागिरी १५९५.९९ १६७६.५२
* लांजा १९१७.०० २३१७.४०
* राजापूर १८५७.७७ २३९६.९५

चौकट
अनियमित पावसाचे भविष्यातील भातशेतीवरील परिणाम
* ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये भातपिक फुलोऱ्यावर येताना किंवा दाणे भरण्याच्या टप्प्यावर पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्यास भाताचे दाणे पोचट राहतात, ज्यामुळे उत्पादनात मोठी घट होते.
* अल्प कालावधीत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे सखल भागातील भातशेती पाण्याखाली जाऊन रोपे कुजतात किंवा वाहून जातात
* पाऊस आणि तीव्र ऊन-दमट हवामान यातील सततच्या चढ-उतारामुळे भातपिकावर रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव वाढतो
* ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पीक कापणीला आलेले असताना परतीचा किंवा अवकाळी पाऊस पडल्यास उभी पिके आडवी होतात. साचलेल्या पाण्यात भाताला शेतातच कोंब फुटतात व पिकाचे प्रचंड नुकसान होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com