

swt1119.jpg
56624
सावंतवाडी : नव्या कार्यकारिणीचे स्वागत करताना जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर व बाजूस जिल्हा व तालुक्यातील उपस्थित कार्यकर्ते.
भारतीय बौद्ध महासभेच्या
तालुकाध्यक्षपदी दिलीप जाधव
नवी कार्यकारिणी : सेक्रेटरीपदी चंद्रशेखर जाधव
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ : भारतीय बौद्ध महासभा शाखा सावंतवाडीची नवी कार्यकारिणी निवडण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी दिलीप जाधव व सेक्रेटरीपदी चंद्रशेखर जाधव यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
तालुका कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा समाज मंदिर सभागृहात नुकतीच झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, सचिव संजय पेंडूरकर, संस्कार विभाग उपाध्यक्ष आर. डी. चेंदवणकर, संघटक सत्यवान चेंदवणकर, प्रचार व पर्यटन सचिव शंकर कदम इत्यादींच्या उपस्थितीत घेण्यात आली. प्रारंभी भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सम्राट अशोक इत्यादींच्या प्रतिमांचे पूजन झाले. मागील वर्षीचा इतिवृत्त अहवाल जमाखर्च कार्य अहवाल वाचन झाल्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आले.
त्यानंतर पुढील दोन वर्षे आहे ते नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात अध्यक्ष - दिलीप जाधव, सरचिटणीस - चंद्रशेखर जाधव, कोषाध्यक्ष - मंगेश कदम, उपाध्यक्ष - सुनील जाधव, सचिव - मिलिंद नेमळेकर व विठ्ठल कदम, उपाध्यक्ष - मोहन जाधव, सचिव - अनंत कदम, यशवंत जाधव, उपाध्यक्ष - वासुदेव जाधव, सचिव - प्रशांत कदम, गणपत जाधव, हिशोब तपासणी - सिद्धार्थ जाधव, संघटक - लक्ष्मण निगुडकर, रमाकांत जाधव, सिद्धार्थ जाधव, मोहन लाडू. यावेळी शालांत परीक्षेत शिरोडा केंद्रात प्रथम आलेल्या आरोशी जाधव व मैत्री सांगेलकर विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.