

rat14p12.jpg-
57271
रत्नागिरी : विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या आवाहनानुसार बॅंक ऑफ इंडियासमोर निदर्शने करताना कर्मचारी, अधिकारी.
---------------
बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांची रत्नागिरीत निदर्शने
पाच दिवसांचा आठवडा करा; रिझर्व्ह बँक, विमाक्षेत्राच्या धर्तीवर मागणी
रत्नागिरी, ता. १४ : बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी पाच दिवसांचा बँकिंग आठवडा तातडीने लागू करावा, या मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या आवाहनानुसार रत्नागिरीत जोरदार निदर्शने करण्यात आली.
शिवाजीनगर येथील बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात बँक कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. "आम्हाला पाच दिवसांचे बँकिंग मिळालेच पाहिजे", अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. भारतीय रिझर्व्ह बँक, विमा क्षेत्र तसेच केंद्र व राज्यशासनाच्या विविध कार्यालयांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू असताना बँक कर्मचाऱ्यांवरच सहा दिवस कामकाजाचा भार का, असा सवाल या वेळी आंदोलकांनी उपस्थित केला.
संगणकीय बँकिंग, डिजिटल व्यवहार, भ्रमणध्वनी व महाजालाद्वारे (इंटरनेट) मिळणाऱ्या बँकिंग सेवांमुळे आज बहुतांश सेवा चोवीस तास उपलब्ध आहेत. त्यामुळे पाच दिवसांचा आठवडा ही केवळ सुट्टीची मागणी नसून कर्मचाऱ्यांचे कल्याण, काम आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल तसेच अधिक कार्यक्षम ग्राहकसेवेसाठी काळाची गरज आहे, अशी भूमिका या वेळी मांडण्यात आली. ही प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली मागणी तातडीने मान्य करून बँकिंग क्षेत्रात पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, असा इशाराही देण्यात आला. या निदर्शनांचे आयोजन किरण खोपडे, मनोज लिंगायत व रोहित सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.