केदार, कुणाल यांचा दूध संघाकडून सत्कार

केदार, कुणाल यांचा 
दूध संघाकडून सत्कार
Published on

केदार, कुणाल यांचा
दूध संघाकडून सत्कार
साखरपा ः देवरुख येथील ‘मातृमंदिर’ संचलित पशुधन आणि दुग्धोत्पादन विद्यालयाच्या पदविका परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल कोंडगाव येथील केदार दिनेश डाफळे आणि भडकंबा येथील कुणाल विश्वनाथ कनावजे यांचा कोंडगाव सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित (दोंदगाव) तर्फे विशेष सत्कार करण्यात आला. दोघांनीही ‘पशुधन आणि दुग्धोत्पादन’ या विषयात यश मिळवल्याने संस्थेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. संस्थेचे चेअरमन अजय वामनराव सावंत यांनी मनोगतात, ‘‘या दोन्ही तरुणांनी मिळवलेले यश आणि घेतलेले शिक्षण हे स्थानिक दुग्धव्यवसायासाठी भूषणावह असून, त्यांच्या या यशाचा संपूर्ण परिसराला अभिमान आहे,’’ अशा शब्दांत कौतुक केले. या प्रसंगी मनोहर शिंदे, आत्माराम बाईंग, सुलक्षणा हेगिष्टे, मनोहर पावसकर, दीपक लाड, विश्वनाथ कनावजे, अरविंद भालेकर, प्रभाकर पाटोळे, चंद्रकांत शिंदे, प्रकाश पवार उपस्थित होते.
-------
कात्रोळी येथे २१ रोजी
नांगरणी स्पर्धा
चिपळूण ः तालुक्यातील कात्रोळी कुंभारवाडी व गुजरवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने २१ रोजी सकाळी १० वाजता नांगरणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांचा रोख पारितोषिके व चषक देऊन गौरव करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी १५ हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकासाठी १० हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकासाठी ७ हजार रुपये व चषक, चतुर्थ क्रमांकासाठी ५ हजार रुपये व चषक, पाचव्या क्रमांकासाठी ४ हजार रुपये व चषक, सहाव्या क्रमांकासाठी ३ हजार रुपये व चषक, तर सातव्या क्रमांकासाठी २ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. आठवा, नववा व दहावा क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना प्रत्येकी १ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे.
--------
चिपळूणमध्ये डॉक्टरांच्या
सुरांनी रंगली मैफील
चिपळूण ः चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे आयोजित ''आषाढरंग २०२६'' हा अभिनव सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहमेळावा अभिरुची येथे उत्साहात पार पडला. कॅरोके सिंगिंग, गप्पाटप्पा आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे रंगलेली ही संध्याकाळ सीजीपीए परिवारासाठी अविस्मरणीय ठरली. या कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप भागवत यांनी वर्षभरातील सामाजिक, वैद्यकीय व संघटनात्मक उपक्रमांचा आढावा पीपीटीद्वारे सादर केला.
डॉ. विशाल पेटकर यांच्या उत्साहपूर्ण सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या कॅरोके सिंगिंग स्पर्धेत डॉक्टर सदस्यांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. डॉ. मंगेश वाजे आणि डॉ. रणजीत पाटील यांनी खुमासदार निवेदन करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. डॉ. अतीन औताडे यांच्या विशेष सहकार्यामुळे कार्यक्रमाचे नेटके आयोजन शक्य झाले. या सोहळ्याला डॉ. संतोष दाभोळकर, डॉ. सुभाष उतेकर, डॉ. राकेश चाळके, डॉ. नितीन शिंदे, डॉ. कृष्णकांत पाटील, डॉ. चैतन्य खोत, डॉ. चेतन पाटील, डॉ. संतोष पाटील, डॉ. प्रसाद खातू, डॉ. निरंजन तांबे, डॉ. संदीप दाभोळकर, डॉ. ऋषिकेश चितळे, डॉ. समिध चिकटे, डॉ. मन्सूर परकार, उपस्थित होते.
----------
कीर लॉ कॉलेजमध्ये
कथाकथन कार्यशाळा
रत्नागिरी ः येथील श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित कथाकथन व कथालेखन अशा दोन दिवसीय कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात प्रसिद्ध लेखिका व कथाकथनकार सुनीता तांबे यांनी विद्यार्थ्यांना कथा शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी मांडावी, तिची रचना कशी असावी आणि प्रभावी कथाकथनासाठी आवश्यक असलेले सूत्ररूपी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कथाकथन करून घेत त्यांच्या सादरीकरणातील गुण-दोष स्पष्ट केले व आवश्यक मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत त्यांनी कथालेखनाची संकल्पना, कथांचे विविध प्रकार, प्रभावी कथा लिहिण्याची तंत्रे आणि लेखनातील आवश्यक घटकांचे सविस्तर विवेचन केले. समारोपप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष बर्वे यांनी कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथन आणि कथालेखन ही कौशल्ये किती महत्त्वाची आहेत, यावर मार्गदर्शन केले. न्यायालयीन युक्तिवाद, तथ्यांची प्रभावी मांडणी, केसचे विश्लेषण आणि संवादकौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी या कौशल्यांचा मोठा उपयोग होतो, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com