बाजारात उपवासाच्या साहित्याला मागणी

बाजारात उपवासाच्या साहित्याला मागणी
Published on

श्रावणात चिपळूण बाजारपेठ फुलली
उपवासाच्या पदार्थांना मागणी; केळीच्या पानाचीही आवक
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ ः श्रावण महिन्याला सुरुवात झाल्याने चिपळूण शहरातील बाजारपेठेत उपवासाच्या पदार्थांना आणि पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याला मागणी वाढली आहे. साबुदाणा, शेंगदाणे, भगर यासह उपवासासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पदार्थांची खरेदी वाढली असून, व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला चांगली चालना मिळत आहे.
श्रावण महिन्यात विविध धार्मिक सण, पूजा आणि व्रतवैकल्यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे उपवासासाठी लागणाऱ्या पदार्थांची मागणीही वाढते. चिपळूणच्या बाजारपेठेत किरकोळ तसेच घाऊक विक्रेत्यांकडे साबुदाणा, शेंगदाणे, भगर यांसह उपवासासाठी लागणाऱ्या इतर साहित्याची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. श्रावणातील धार्मिक कार्यक्रम आणि धार्मिक विधींमुळे केळीच्या पानांनादेखील मागणी वाढली आहे. चिपळूण परिसरासह ग्रामीण भागातून बाजारात केळीची पाने विक्रीसाठी आणली जात आहेत. पारंपरिक पद्धतीने भोजन वाढण्यासाठी तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये केळीच्या पानांचा वापर केला जात असल्याने त्यांची विक्री वाढली आहे. श्रावणातील पुढील सण आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे केळीच्या पानांसह उपवासाच्या साहित्याला मागणी कायम राहण्याची शक्यता आहे. श्रावणामुळे बाजारपेठेत धार्मिक साहित्याबरोबरच उपवासाच्या पदार्थांची उलाढाल वाढल्याने व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com