

चिपळुणातील रस्त्यांचे रुंदीकरण सुरू
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः शासनाने मंजूर केलेल्या शहरविकास आराखड्यानुसार चिपळूण शहरातील तीन प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबत चिपळूण नगर परिषदेने १७ ऑगस्ट रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केली असून, बाधित मिळकतधारकांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.
चिपळूण शहरातील रुंदीकरण होणाऱ्या तीन प्रमुख रस्त्यांमध्ये बहादूरशेख नाका ते चिंचनाका, चिंचनाका ते पॉवरहाऊस, अमेय पार्क ते गांधारेश्वर ब्रिज यांचा समावेश आहे. पालिकेमार्फत या रस्त्यांची प्रत्यक्ष जागेवर आखणी करण्यात आली असून, बाधित मिळकतधारकांना नोटिसा व स्मरणपत्रे पाठवण्यात आली आहेत. रस्ता रुंदीकरणासाठी जमीन देणाऱ्या मिळकतधारकांना मोबदला म्हणून ‘एफएसआय’ किंवा ‘टीडीआर’ देण्याची तरतूद आहे. इच्छुकांनी जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत नगर परिषदेकडे अर्ज करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या मुदतीनंतर पुढील प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होईल. वाढती वाहतूक कोंडी आणि शहराचा विस्तार लक्षात घेता हे रुंदीकरण अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, आता या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.