‘महा वॉकेथॉन’मधून ‘माती वाचवा, पाणी जपा’चा संदेश

‘महा वॉकेथॉन’मधून ‘माती वाचवा, पाणी जपा’चा संदेश
Published on

58693
सिंधुदुर्गनगरी : ‘महा वॉकेथॉन’ स्पर्धेला हिरवा झेंडा दाखविताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उपाध्यक्ष तुकाराम साईल.
58694
सिंधुदुर्गनगरी : महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर स्पर्धेतील प्रथम तीन विजेते.


‘महा वॉकेथॉन’मधून ‘माती वाचवा, पाणी जपा’चा संदेश

जलसंधारण दिनाचे निमित्त; सिंधुदुर्गनगरीत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २१ : ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ हा मृद व जलसंधारणाचा संदेश देत आज सिंधुदुर्गनगरीच्या रस्त्यांवर शेकडो नागरिक एकवटले. जलसंधारण दिनानिमित्त आयोजित ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ला जिल्हावासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. युवक, विद्यार्थी, महिला, नागरिकांसह शासकीय अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था व सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत जलसंधारणाचा जागर केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, दीपलक्ष्मी पडते, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष शिरोडकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी उपस्थितांना जलसंधारणाची शपथ दिली. त्या म्हणाल्या, भविष्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आतापासूनच पाणी बचतीची सवय लावणे आवश्यक आहे. शेतीत कमी पाण्याच्या पर्यायांचा वापर वाढविण्यासह मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती करावी लागेल. सिंधुदुर्गात या विषयावर चळवळ उभी राहत आहे. जलसंधारण सप्ताहात नागरिकांनी घेतलेल्या सक्रिय सहभागाबद्दल त्यांनी आभार मानले. दरम्यान, जिल्हाधिकारी व मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून वॉकेथॉनला प्रारंभ केला. ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ या संदेशासह सहभागी उत्साहात मार्गस्थ झाले. सहभागी स्पर्धकांना याच संदेशाचे टी-शर्ट देण्यात आले. पोलिस परेड मैदानावरून सुरू झालेली वॉकेथॉन डॉन बॉस्को हायस्कूल सर्कलमार्गे जिल्हा नर्सिंग कॉलेज येथून पुन्हा पोलिस परेड मैदानावर येऊन समाप्त झाली. विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
--------
वैभव नार्वेकर प्रथम
वॉकेथॉनमध्ये सिंधुदुर्गनगरीच्या वैभव नार्वेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावत २५ हजारांचे बक्षीस मिळविले. वैभववाडीच्या वैभव वाघमोडे यांनी द्वितीय क्रमांक मिळवत १५ हजार, तर सिंधुदुर्गनगरीच्या अभिजीत जेडयार यांनी तृतीय क्रमांकासह १० हजारांचे बक्षीस मिळविले. सहभागींपैकी ईश्वरी चिठ्ठीद्वारे सात जणांची विशेष बक्षिसांसाठी निवड करण्यात आली. प्रत्येकाला तीन हजाराचे बक्षीस देण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा हौशी ॲथलेटिक संघटनेच्या कल्पना तेंडुलकर व बाळकृष्ण कदम यांचे सहकार्य लाभले. राजश्री सामंत यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com