

58773
‘राष्ट्रध्वज माझा अभिमान’च्या
लेखिकेचा लायन्स क्लबतर्फे गौरव
सावंतवाडी, ता. २१ : लेखिका स्वप्ना विकास गोवेकर यांनी लिहिलेल्या ''राष्ट्रध्वज माझा अभिमान'' या गद्य पाठाचा इयत्ता सहावीच्या मराठी विषयाच्या पाठ्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने स्वप्ना गोवेकर यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
‘राष्ट्रध्वज माझा अभिमान’ या पाठातून विद्यार्थ्यांच्या मनात देशाविषयी अभिमान, राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्तीची भावना निर्माण होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेखिकेचा पाठ शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट होणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी लायन्स क्लबच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन सुनील दळवी, सेक्रेटरी लायन प्रकाश राऊळ, खजिनदार लायन मेघना राऊळ, एमजेएफ लायन ॲड. अभिजीत पणदूरकर, वरिष्ठ सदस्य लायन गणेश बोर्डेकर, लायन महेश पाटील, लायन अनिल आवटी व लायन श्रद्धा सावंत उपस्थित होते.
-------------
58774
‘लायन्स’तर्फे गरजूची मोतीबिंदू सर्जरी
सावंतवाडी : आर्थिक परिस्थितीअभावी मोतीबिंदूचे ऑपरेशन करणे शक्य नसलेल्या रेखा ढोले यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने यशस्वीपणे करण्यात आले. क्लबने केलेल्या या मदतीबद्दल ढोले यांनी आभार व्यक्त केले. रेखा ढोले या गरीब कुटुंबातील असून, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे लायन्स क्लबच्या निदर्शनास आले. त्यानंतर क्लबच्या वतीने त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाबद्दल लायन्स क्लबचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात आले. यावेळी क्लबचे अध्यक्ष लायन सुनील दळवी, सेक्रेटरी प्रकाश राऊळ, खजिनदार मेघना राऊळ, एमजेएफ ॲड. अभिजीत पणदूरकर, वरिष्ठ सदस्य गणेश बोर्डेकर, महेश पाटील, अनिल आवटी, श्रद्धा सावंत आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.