

जखमी गायीला जीवदान
तरुणांचा पुढाकार; विसर्जन घाटावरील घटना
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २२ ः येथील विसर्जन घाटावर आज सकाळी पाण्यात पडून गंभीर जखमी झालेल्या एका गायीला स्थानिक तरुणांच्या प्रसंगावधानामुळे वेळेत वैद्यकीय मदत व आसरा मिळाला.
पाण्यात पडल्यामुळे गायीच्या पाठीला इजा झाल्याने ती अत्यंत वेदनेने विव्हळत उघड्या उन्हात पडून होती. दुपारच्या सुमारास मच्छीमार्केट पुलावरून जात असताना अयान मिथागिरी यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी मुशर्रफ पेशकर यांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू केले. गायीला सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी निखिल किल्लीकर यांच्यामार्फत चिपळूण नगरपालिकेचे आरोग्य सभापती शुभम पिसे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. पिसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गायीला बाहेर काढण्यासाठी इक्बालभाई कच्छी यांच्या सहकार्याने क्रेन मागवण्यात आली. सर्वांच्या समन्वयातून गायीचे सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले. या बचावकार्यात अयान मिथागिरी, मुशर्रफ पेशकर, निखिल किल्लीकर, आरोग्य सभापती शुभम पिसे आणि इक्बाल कच्छी यांनी मोलाची भूमिका बजावली. मुक्या प्राण्याच्या वेदना ओळखून तरुणांनी दाखवलेली ही संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी चिपळूण परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.