‘चौके आनंदव्हाळ रस्त्यावरील धोकादायक चर तत्काळ बुजवा’

‘चौके आनंदव्हाळ रस्त्यावरील 
धोकादायक चर तत्काळ बुजवा’
Published on

58941

‘चौके-आनंदव्हाळ रस्त्यावरील
धोकादायक चर तत्काळ बुजवा’

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २२ : ‘महावितरण कंपनीने भूमिगत वीज वाहिनी टाकण्याच्या कामासाठी चौके ते आनंदव्हाळ या मुख्य मार्गावर चार विविध ठिकाणी रस्त्यावर खोदलेले चर आता वाहनधारकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. गणेशोत्सवापूर्वी येथे डागडुजी करावी,’ अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
कामाच्या वेळी ठेकेदाराने हे चर केवळ माती टाकून बुजवले होते. मात्र, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या चरांमधील सर्व माती वाहून गेली असून, त्या ठिकाणी भलेमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून दुचाकी चालवणे कठीण व त्रासदायक झाले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. वाहनधारकांना खड्ड्यांचा अचूक अंदाज येत नसल्याने अचानक दुचाकी खड्ड्यात जाऊन भीषण अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. या गंभीर समस्येची सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ दखल घेऊन हे चर तातडीने डांबराने बुजवून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, अशी मागणी चौके माजी सरपंच पी. के. चौकेकर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com