नारळ उत्पादकांना मिळणार मोफत खत

नारळ उत्पादकांना
मिळणार मोफत खत
Published on

नारळ उत्पादकांना
मिळणार मोफत खत
बांदा, ता. २४ ः नारळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी नारळ विकास मंडळाकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी मोफत खत उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रति माड १२० रुपये किंमतीचे खत मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे अर्ज भरण्याचे काम बांदा येथील सिंधुदुर्ग फळबागायतदार संस्थेच्या कार्यालयात सुरू आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करावा. शेतकऱ्यांनी आधारकार्ड, माडाची नोंद असलेला सातबारा उतारा आणि एक पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणावा. अर्ज भरण्याची सुविधा शहरातील राजगुरू कॉम्प्लेक्स येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. नारळ उत्पादक शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग फळबागायतदार संस्थेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे अध्यक्ष विलास सावंत यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com