

सावर्डेतील महाविद्यालयात
‘बिझनेस क्लब’ची स्थापना
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २५ : ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत कला व विज्ञान महाविद्यालय, सावर्डे येथे ‘बिझनेस क्लब’ची स्थापना करण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची वृत्ती निर्माण करणे, व्यवसायाच्या विविध संधींची माहिती करून देणे, नेतृत्व गुण, आर्थिक साक्षरता वाढवणे तसेच विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार व स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहित करणे, हा बिझनेस क्लब स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे.
बिझनेस क्लबच्या प्रमुखपदी सानिका वनये, करिअर संसदच्या उद्योजकता विकास मंत्री यांची निवड करण्यात आली. तसेच मनस्वी ओकटे, वेदिका शिगवन, नेहा कोंडविलकर आणि सानिका जाधव यांची क्लबच्या सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन, उद्योजकता विकास, व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, व्यवसाय कल्पना सादरीकरण, स्टार्टअप् विषयक नामवंत उद्योजक ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत. प्राचार्य प्रा. तानाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करिअर कट्टा उपक्रमाचे समन्वयक प्रा. जयसिंग चवरे यांच्या पुढाकाराने बिझनेस क्लबच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.