सावर्डे-खचलेल्या कॉंक्रिट रस्त्याला वाळू, खडीचा मुलामा

सावर्डे-खचलेल्या कॉंक्रिट रस्त्याला वाळू, खडीचा मुलामा
Published on

rat25p15.jpg-
59530
सावर्डे : डेरवण फाट्याजवळील खचलेला रस्ता खडी, वाळू टाकून बुजवण्यात आला आहे. (छायाचित्र : अशोक कदम, सावर्डे)

रस्ता खचला, वाळू-खडीने डागडुजी
सावर्डेतील महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह; पुलालाच धोका होण्याची शक्यता
सावर्डे, ता. २५ : कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सावर्डे येथील डेरवण फाट्याजवळ, आरती स्वीट्स दुकानासमोर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावरील चारपदरी महामार्गाचा रस्ता अचानक खचला. प्रशासनाने याची दखल घेतली; परंतु या खचलेल्या रस्त्यावर केवळ वाळू आणि खडी टाकून रस्ता बुजवला आहे आणि दोन्ही मार्गांवरून संथगतीने वाहतूक सुरू केली आहे.
अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी याच पुलावर गोव्याकडे जाणारा दुपदरी रस्ता खचला होता तो दुरूस्त होत आहे तोपर्यंत आता मुंबईकडे जाणारा रस्ता खचल्याने महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदाराच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सध्या या मार्गावरून वाहतूक सुरू झाली असली तरी रात्री या महामार्गावरून प्रचंड वेगाने वाहने धावतात. अंधारात किंवा अचानक समोर येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशझोतात हे फलक न दिसल्यास एखादे मोठे वाहन किंवा दुचाकी या खचलेल्या भागात फसून अपघात होण्याची शक्यता आहे. प्रशासनाचा हा कारभार प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तज्ज्ञ कमिटी नेमून या पुलाचे तांत्रिक परीक्षण करावे. केवळ वाळू-खडी न टाकता खचलेला भाग पूर्ण उकरून काढून आधुनिक तंत्रज्ञानाने पाया मजबूत करावा तसेच रात्रीच्या वेळी या ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

चौकट
१५ दिवसांपूर्वी विरूद्ध दिशेला खचला होता रस्ता
पंधरा दिवसांपूर्वी गोव्याकडे जाणारा रस्ता खचला तेव्हाच प्रशासनाने संपूर्ण पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे होते; मात्र, केवळ ''वरवर'' दुरूस्ती करून रस्ता मोकळा करण्यात आला. त्याचाच परिणाम म्हणून आता मुंबईकडे जाणारा मार्ग खचला आहे. संपूर्ण पुलाचे मजबुतीकरण केले नाही तर भविष्यात हा पूलच खचण्याचा धोका नाकारता येत नाही.

कोट
चारपदरी मार्ग बनवताना या पुलाची तांत्रिक बाजू समजून घेणे गरजेचे होते; मात्र तसे झाले नाही. हा थेट प्रवाशांच्या जीवाशी चाललेला खेळ आहे. सुविधा आणि सुरक्षेच्या नावावर अशी निकृष्ट कामे करून लोकांचा बळी घेण्याची वाट पाहिली जात आहे
- सूर्यकांत चव्हाण, अध्यक्ष, व्यापारी संघ, सावर्डे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com