नवीन महाराष्ट्र हायस्कूल पुलाला कै. माधवराव खरे यांचे नाव द्या

नवीन महाराष्ट्र हायस्कूल पुलाला कै. माधवराव खरे यांचे नाव द्या
Published on

नव्या पुलाला ‘माधवराव खरे’
नाव द्या ः सुनील जांभेकर
मुख्याधिकाऱ्यांना निवेदन ; सामाजिक योगदानाची दखल घ्‍या
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ : रामतीर्थ स्मशानभूमीच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे कै. माधवराव खरे यांच्या कार्याची दखल घेत माप ते महाराष्ट्र हायस्कूलदरम्यान बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सुनील जांभेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी चिपळूण पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.
रामतीर्थ स्मशानभूमी ही शहराच्यादृष्टीने अत्यंत जुनी आणि महत्त्वाची स्मशानभूमी आहे; मात्र, या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाले होते. अशा परिस्थितीत कै. माधवराव खरे यांनी स्मशानभूमीच्या विकासाचा प्रश्न हाती घेतला. स्वच्छता, संरक्षण भिंत, दिवाबत्ती, पाण्याची व्यवस्था आणि सुशोभीकरणासाठी त्यांनी स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून प्रयत्न केले. स्मशानभूमीसारख्या संवेदनशील आणि दुर्लक्षित विषयासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार हा त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे उदाहरण असल्याचे जांभेकर यांनी म्हटले आहे. सार्वजनिक ठिकाणांना नावे देताना सामाजिक योगदानाचीही दखल घेतली जावी. कै. खरे यांच्या कार्याची आठवण पुढील पिढ्यांपर्यंत राहावी आणि त्यांच्या सामाजिक कार्याला उचित सन्मान मिळावा, यासाठी ‘कै. माधवराव खरे पूल’ असे नामकरण करणे योग्य ठरेल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. या मागणीचा प्रस्ताव चिपळूण पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडावा, अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com