

- ratchl३१.jpg-
26O61552
चिपळूण ः सभापतींना निवेदन देताना संघटनेच्या पदाधिकारी.
---
ग्रामसखींचा ऑनलाइन कामाला नकार
प्रलंबित मागण्या मान्य करा ; संघटनेचे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः ग्रामसखींचे मासिक मानधन १५ हजार रुपये तर प्रभागसंघ स्तरावरील केडरला २४ हजार रुपये निश्चित मानधन द्यावे, ग्रामसखींचा १० लाख रुपयांचा विमा उतरवावा यांसह विविध मागण्यांचे निवेदन उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्यावतीने पंचायत समितीचे प्रभारी सभापती संदेश आयरे व गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील यांना देण्यात आले. मागण्या मान्य होईपर्यंत ऑनलाइन कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
गाव व प्रभागस्तरावर काम करणाऱ्या ग्रामसखी व केडरवर विविध भौतिक तसेच ऑनलाइन कामांचा दबाव टाकला जात असल्याने मानसिक व आरोग्यसमस्या निर्माण होत असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. ऑनलाइन कामासाठी दर्जेदार टॅब उपलब्ध करून द्यावेत. ‘लखपती दीदी’ माहिती संकलनासाठी बिहार, मध्यप्रदेश व उत्तरप्रदेशच्या धर्तीवर मानधन द्यावे, अशीही मागणी करण्यात आली.
ग्रामसखींना इतर गावांमध्ये काम केल्यास अतिरिक्त प्रवासभत्ता तसेच इतर विभागांच्या कामाचे अतिरिक्त मानधन द्यावे. कायमस्वरूपी अपंगत्व, अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान किंवा विमा संरक्षण द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.
ग्रामसखींना महिन्याचे ३० दिवस काम करावे लागत असून, त्या तुलनेत मिळणारे मानधन तुटपुंजे असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत ऑनलाइन कामावर बहिष्कार सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी प्रीती होडे, दर्शना शिर्के, पूर्वा भोसले, अवंतिका मोरे, योगिता शिर्के, मेघा जठार, अमिषा रामपूरकर, नीशा पवार, सायली, स्वरा शिंदे व वीणा फाळके उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.