डीबीजेच्या तीन छात्रांची थल सैनिक कॅम्पसाठी निवड

डीबीजेच्या तीन छात्रांची थल सैनिक कॅम्पसाठी निवड
Published on

- ratchl९१.jpg-
26O62901
श्रेयस मानकर
-ratchl९२.jpg-
26O62902
अथर्व कदम
-ratchl९३.jpg-
26O62903
राज कदम
------
‘डीबीजे’च्या शिरपेचात मानाचा तुरा

‘थल सैनिक कॅम्प’साठी तिघांची निवड

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः डीबीजे महाविद्यालयातील एनसीसी विभागाने उल्लेखनीय कामगिरीची परंपरा कायम ठेवली आहे. १९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराडच्या तीन छात्रांची प्रतिष्ठित थल सैनिक कॅम्प, दिल्लीसाठी एकाचवेळी निवड झाली आहे. प्रथमच तीन छात्रांची या शिबिरासाठी निवड झाल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
प्रथम वर्ष वाणिज्यचा राज कदम, द्वितीय वर्ष बायोटेक्नॉलॉजीचा श्रेयस मानकर आणि एसवाय डाटा सायन्सचा अथर्व कदम यांची थल सैनिक कॅम्पसाठी निवड झाली. नुकतेच तिन्ही छात्र दिल्लीतील कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी अमरावती येथून रवाना झाले. या छात्रांना १९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराडचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय कुमार सिंग, ॲडम ऑफिसर कर्नल के. पद्मनाभन, पीआय स्टाफ, मेजर नम्रता माने व लेफ्टनंट मधुसूदन माने यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल अध्यक्ष मंगेश तांबे, सचिव अतुल चितळे, नियामक समिती सदस्य, प्राचार्य डॉ. माधव बापट, उपप्राचार्य डॉ. ऋचा खवणेकर, डॉ. चेतन आठवले आणि रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com