

- rat२p११.jpg-
26O67382
रत्नागिरी : जीजीपीएस शाळेत लालबहादूर शास्त्री, महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त वर्गाची स्वच्छता करताना विद्यार्थी.
‘जीजीपीएस’मध्ये स्वच्छता अभियान
रत्नागिरी ः रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जीजीपीएस शाळेमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूरशास्त्री जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आले. सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी वर्गखोल्या व शालेय परिसर स्वच्छ करण्यात आला. या वेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वच्छतामोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अपूर्वा मूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ओवी बंडबे यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली, श्रावणी फडके यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याची माहिती दिली. नेत्रा केळकर यांनी सूत्रसंचालन केले.
-----
‘देव, घैसास, कीर’मध्ये घोषवाक्य स्पर्धा
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात शुक्रवारी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त महाविद्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. दूर्वा टिळेकर हिने लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. प्राची जोशी हिने महात्मा गांधी यांच्या कार्याचा आढावा घेतला. स्वच्छता सप्ताह - २०२६ अंतर्गत स्वच्छतेचे महत्त्व या विषयावर घोषवाक्य स्पर्धा नाटेकर हॉलमध्ये झाली. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शिवानी पाटील, द्वितीय प्रियंका नेवरेकर, तृतीय दीक्षा आंब्रे यांनी यश मिळवले. कार्यक्रमाला उपप्राचार्या वसुंधरा जाधव, प्रा. विनय बावदाने, प्रा. राखी साळगावकर, एप्रा. मिथिला वाडेकर, तसेच विद्यार्थी उपस्थित होते. स्वरांगी विचारे हिने सूत्रसंचालन ले.
-ratchl२४.jp ः
P26O67477
चिपळूण ः विभागस्तरावर निवड झालेला सती विद्यालयाचा संघ.
सती विद्यालयाचा कबड्डी संघ विभागीय स्तरावर
चिपळूण ः जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत खेर्डी चिंचघरी सती विद्यालयाच्या कब्बडी संघाची कोल्हापूर विभागीय स्तरावर निवड झाली आहे. सती विद्यालयाने जिल्हास्तरीय प्रथम फेरीतील राजापूर विरुद्ध चिपळूण या रंगतदार सामन्यात सुजल मोहिते यांनी उत्कृष्ट चढाई करत वर्चस्व ठेवले. रोहित पवार व यश मोडक यांनी त्याला जोरदार साथ दिली. रत्नागिरी विरुद्ध चिपळूण या अटीतटीच्या सामन्यांत दोन्ही संघ बरोबरीत झाला. यामध्ये चिपळूण संघाने आकर्षक चढाई करत प्रथम फेरीत विजय खेचून आणला. स्पर्धेतील अंतिम सामना दापोली विरुद्ध चिपळूण प्रेक्षणीय ठरला. सुरुवातीपासूनच सतीच्या संघाने आक्रमक चढाई करत शिवम सहनी, सुजल मोहिते, जयेश पंदीरकर यांनी दमदार सुरुवात केली तर आर्यन घरत, यश मोडक, रोहित पवार, साहिल घरट यांनी यांनी उत्कृष्ट पकडी करत दापोली संघाबरोबर सामना अंतिम वेळेपर्यंत बरोबरीत आणला होता. यामध्ये सती खेळाडूंनी आक्रमकता व कौशल्याच्या जोरावर आघाडी घेत दापोली संघावर मात केली.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.