

ई-पीकपाहणीला
तांत्रिक अडथळा
झाडांची नोंद सातबाऱ्यावर प्रलंबित
साखरपा, ता. ५ : शेतकऱ्यांनी केलेल्या ई-पीकपाहणीला दीड महिना झाला तरी अद्याप मंजुरी मिळालेली नाही. शेतकऱ्यांनी नोंदवलेल्या झाडांची नोंद अजूनही सातबारा उताऱ्यावर आलेली नाही. तांत्रिक अडचणींमुळे विलंब होत असल्याचे कारण महसूल विभागाकडून देण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीत लावलेल्या झाडांच्या नोंदी ई-पीकपाहणी अॅपद्वारे केली जात आहे. त्यासाठी नियुक्त केलेले सहाय्यक हे गावात फिरून सदर नोंदी करत आहेत. प्रारंभी या अॅपमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. गावातून अनेक गट नंबर गायब झाल्याचे पीकपाहणी करताना निदर्शनास आले होते. काही गट नंबर यांचे प्रत्यक्ष जागेपेक्षा अॅपमध्ये वेगळ्या ठिकाणी दाखवत होते. या सगळ्यामुळे ई -पीकपाहणी करणे अडचणीचे ठरत होते. याची माहिती महसूल विभागाला देण्यात आल्यावर त्या त्रुटी दूर करण्यात आल्या आणि गेल्या महिन्यापासून ई-पीकपाहणी सुरळीत सुरू झाली; मात्र सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी केलेल्या नोंदी सातबारा उतार्यावर आलेल्या नाहीत. याबाबत तलाठ्यांकडे चौकशी केली असता तलाठी कार्यालयातून मंजुरी देण्यात आली आहे; पण तांत्रिक कारणांमुळे त्या नोंदी सातबारा उताऱ्यांवर आलेल्या नाहीत, असे सांगण्यात येत आहे. तांत्रिक अडचणी दूर होऊन या नोंदी कधी उताऱ्यांवर येतील, अशी विचारणा केली असता त्याचे निश्चित उत्तर महसूल विभागाकडून देण्यास टाळाटाळ होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.